Doval-Putin Meeting: अजित डोवाल पोहोचले रशियाला, पुतीन यांची भेट घेतली; जगात...!

India-Russia Ties: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी गुरुवारी मॉस्को येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली.
Vladimir Putin NSA Ajit Doval
Vladimir Putin NSA Ajit DovalDainik Gomantak
Published on
Updated on

Doval Russia Visit: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी गुरुवारी मॉस्को येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी पुतीन यांच्यासोबत विविध द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा केली. तसेच दोन्ही देशांमधील धोरणात्मक भागीदारीसाठी काम सुरु ठेवण्याचे मान्य केले.

रशियातील (Russia) भारतीय दूतावासाने सांगितले की, 'चर्चा द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर केंद्रित होती.' मात्र, त्यांनी या मुद्द्यांचा तपशील दिला नाही. एनएसए डोवाल यांनी राष्ट्रपती पुतिन यांची भेट घेतल्याचे दूतावासाने ट्विटरवर सांगितले.

Vladimir Putin NSA Ajit Doval
Russia-Ukraine: रशिया-युक्रेन युध्दादरम्यान भारताची मोठी तेल खरेदी, रशियाने...

ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'विविध द्विपक्षीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर, धोरणात्मक बाबीवर काम करण्यासाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे.' डोवाल बुधवारी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर पोहोचले.

संबंध अधिक दृढ करायचे

भारतातील रशियाचे राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी सोमवारी सांगितले की, 'रशियाला भारतासोबतचे (India) संबंध अधिक दृढ करायचे आहेत.' एनएसएच्या दौऱ्याच्या सुमारे तीन महिन्यांपूर्वी परराष्ट्रमंत्री एस जयशंकर रशियाला गेले होते.

यादरम्यान, दोन्ही देशांनी आपल्या आर्थिक संबंधांचा विस्तार करण्याचा संकल्प केला होता, ज्यामध्ये रशियाकडून पेट्रोलियम उत्पादनांची आयात देखील समाविष्ट होती.

Vladimir Putin NSA Ajit Doval
Vasco: रशिया-युक्रेन युद्ध थांबावे! शांततेचा संदेश घेऊन 59 वर्षीय व्यक्ती करणार गोवा भ्रमण

या बैठकीत अनेक देशांचे नेते सहभागी झाले होते

रशिया आणि भारताव्यतिरिक्त इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, चीन, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानचे NSA या बैठकीत सहभागी झाले होते. काही आठवड्यांनंतर दिल्लीत होणाऱ्या G-20 परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीपूर्वी डोभाल रशियाला गेले आहेत. 1 आणि 2 मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत सहभागी होण्यासाठी रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव भारतात येऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com