संपूर्ण जगात शांतता निर्माण होण्यासाठी, वास्को सासमोळे बायणा (Vasco, Baina) येथील नरेश राजाराम चोपडेकर (Naresh Rajaram Chopdekar) यांनी सायकलवरून गोव्यातील सर्व तालुक्यात भ्रमण करण्याचे शुभारंभ केला. चोपडेकर यांनी मुरगाव तालुक्यातून मंगळवार (दि.03) सायकल वरून आपल्या चांगल्या कार्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी सुरुवात केली.
वास्को बायणा येथील रहीवाशी नरेश चोपडेकर (60) यांनी गोव्यातील सर्व तालुक्यात भ्रमण करून संपूर्ण जगात शांतता, सायकलवरून प्रवास करून इंधनाची बचत करणे. तसेच रशिया व युक्रेनचे युद्ध (Russia-Ukrain War) थांबवावे अशा संदेश चोपडेकर यांनी जनतेला सायकल वरून भ्रमण करून करीत आहे. सर्वानी कोविड-19 महामारी पासून सावध राहण्यासाठी राज्य आरोग्य विभागाच्या नियमांचे पालन केले पाहिजे.
प्रत्येक वाहन चालकाने वाहतुकीचे नियमांचे पालन करून, गोवा पोलिसांना (Goa Police) सहकार्य करावे. भारत देशाची लोकसंख्या 147 करोड असून प्रत्येकांनी दर महिन्याला 10 रुपये सरकारला राष्ट्रहितासाठी आर्थिक मदत म्हणून द्यावी,अशा संदेश नरेश चोपडेकर आपल्या सायकलवरून जनते पर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.