युक्रेनियन मुलांच्या मदतीसाठी रशियन पत्रकाराने केला नोबेल पुरस्काराचा लिलाव

रशियन पत्रकार दिमित्री मुराटोव्ह यांनी युक्रेनियन मुलांना पैश्याची मदत करण्यासाठी शांततेचा नोबेल पुरस्काराचा लिलाव केला आहे.
Dmitry Muratov
Dmitry MuratovDainik Gomantak

रशियन पत्रकार दिमित्री मुराटोव्ह (Dmitry Muratov) यांनी युक्रेनियन (Ukraine) मुलांना पैश्याची मदत करण्यासाठी शांततेचा नोबेल पुरस्काराचा लिलाव केला आहे. सोमवारी रात्री हा पुरस्कार 103.5 दशलक्ष डॉलर्सला विकला गेला आहे. लिलावातून मिळालेली रक्कम युक्रेनमधील युद्धामुळे विस्थापित झालेल्या मुलांच्या कल्याणासाठी वापरली जाणार आहे. लिलावाचे आयोजन करणाऱ्या हेरिटेज ऑक्शन्सच्या प्रवक्त्याने मात्र हा पुरस्कार कोणी विकत घेतला हे उघड केलेले नाही. (Russian journalist has offered a helping hand to Ukrainian children and auctioned off a Nobel Prize)

Dmitry Muratov
अमेरिकेत पॉपकॉर्न तर जर्मनीत बिअरसाठी लोक त्रस्त

दुसऱ्या देशातील व्यक्तीने ते विकत घेतल्याचे समोर आले आहे. जवळपास तीन आठवडे चाललेली लिलाव प्रक्रिया 'जागतिक निर्वासित दिना'च्या दिवशी संपली आहे. मुराटोव्हने एका मुलाखतीत सांगितले की, 'मला पाठिंबा मिळेल अशी अपेक्षा होती, पण मला इतक्या मोठ्या रकमेची अपेक्षा कधीच नव्हती.' तसेच याआधी 2014 मध्ये जेम्स वॉटसनचा नोबेल पुरस्कार सर्वाधिक $47.60 दशलक्षमध्ये विकला गेला होता.

डीएनएच्या संरचनेच्या सह-शोधासाठी हे पारितोषिक देण्यात आले आहे. मुराटोव्ह, ज्यांना ऑक्टोबर 2021 मध्ये सुवर्णपदक मिळाले होते, त्यांनी नोवाया गॅझेटा या स्वतंत्र रशियन वृत्तपत्राची स्थापना केली आणि मार्चमध्ये पेपर बंद झाला तेव्हा ते त्या पेपरचे मुख्य संपादक होते. रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला आणि पत्रकारांवर रशियन कारवाईच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक निषेध दडपल्यामुळे हे वृत्तपत्र बंद करण्यात आले होते.

Dmitry Muratov
ब्रिटनमध्ये 40 हजार रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप

मुराटोव्ह यांनी बक्षिसाच्या लिलावातून चॅरिटीला $500,000 रोख देणगी देण्याची घोषणा केली आहे. ही रक्कम थेट युनिसेफकडे जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे. लिलाव संपल्यानंतर लगेचच युनिसेफने पैसे मिळाले असल्याचे सांगितले आहे. तसेच 1 जूनपासून ऑनलाइन लिलाव प्रक्रिया सुरू झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com