Russia Ukraine War: युक्रेनच्या क्षेपणास्त्र हल्ल्याने रशिया हादरला, कमांडरसह 34 सैनिक ठार

Russia Ukraine War News: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये.
Russia Ukraine War
Russia Ukraine WarDainik Gomantak

Russia Ukraine War News: रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता, रशियाच्या हल्ल्यांना युक्रेन आता धैर्याने उत्तर देत आहे. दरम्यान, युक्रेनने पुन्हा एकदा रशियावर क्षेपणास्त्र हल्ला केला आहे.

या हल्ल्यात 34 जवान शहीद झाल्याचे वृत्त आहे. यामध्ये एका कमांडरचाही समावेश आहे. खुद्द युक्रेननेच हा दावा केला आहे.

रशियाच्या ब्लॅक सी फ्लीटवर हल्ला केल्याचे युक्रेनच्या स्पेशल टास्क फोर्सने सांगितले आहे. या हल्ल्यात कमांडर अॅडमिरल व्हिक्टर सोकोलोव्हसह 33 सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे, युक्रेनच्या बाजूने सांगण्यात आले की, हा क्षेपणास्त्र हल्ला सेवस्तोपोलच्या क्रिमियन बंदरावर करण्यात आला आहे. ब्लॅक सी फ्लीटच्या मुख्यालयावर हा हल्ला करण्यात आला.

रशियाच्या (Russia) अधिकाऱ्यांनी सोमवारी सांगितले की, हवाई संरक्षण यंत्रणेने क्रिमियन द्वीपकल्पातील सेवास्तोपोलवर युक्रेनचा क्षेपणास्त्र हल्ला हाणून पाडला. अधिकार्‍यांच्या दाव्याव्यतिरिक्त युक्रेनचे वक्तव्य चकीत करणारे आहे.

Russia Ukraine War
Russia-Ukraine War: युक्रेन युद्धात उत्तर कोरियाची उडी? रशियाच्या उपकाराची करणार परतफेड

युक्रेनच्या लष्कराचा मोठा दावा

रशियाच्या हवाई संरक्षण यंत्रणेने बेल्बेक हवाई तळाजवळ एक क्षेपणास्त्र पाडले. मॉस्को-नियुक्त सेवास्तोपोलचे गव्हर्नर मिखाईल रझवोझायेव यांनी टेलिग्राम मेसेजिंग अॅपवर याबाबत सांगितले.

याआधी, युक्रेनच्या स्पेशल टास्क फोर्सने दावा केला होता की, रशियन नौदलाच्या बैठकीत उपस्थित असलेले सैनिक हे सेवास्तोपोलमधील ब्लॅक सी फ्लीटच्या मुख्यालयावर शुक्रवारी झालेल्या हल्ल्याचे लक्ष्य होते. "रशियन ब्लॅक सी फ्लीटच्या मुख्यालयावर झालेल्या हल्ल्यात फ्लीट कमांडरसह 34 अधिकारी मारले गेले," असा दावा युक्रेनियन स्पेशल फोर्सने केला.

तर उर्वरित 105 सैनिक जखमी झाले. मुख्यालयाची इमारतही उद्ध्वस्त झाली आहे. मात्र, रिपोर्टमध्ये सोकोलोव्ह यांचे नाव नव्हते.

दुसरीकडे, युक्रेनच्या (Ukraine) गृहमंत्र्यांचे सल्लागार अँटोन गेराश्चेन्को यांनी अॅडमिरलचे नाव आणि एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

दरम्यान, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने अद्याप सोकोलोव्ह यांच्या हत्येवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. शुक्रवारी झालेल्या हल्ल्यानंतर रशियाने एक व्यक्ती बेपत्ता असल्याची माहिती दिली होती.

यूएस स्थित थिंक टँक इन्स्टिट्यूट फॉर द स्टडी ऑफ वॉर (ISW) च्या मते, रशिया आणि युक्रेनने युद्धात झालेल्या नुकसानाची अनेक वेळा अतिशयोक्ती केली आहे. दोन्ही देश त्यांच्या नुकसानावर फारच कमी भाष्य करतात.

Russia Ukraine War
Russia-Ukraine War: रशियाच्या बॉम्ब हल्ल्यात वर्षभरात युक्रेनच्या 900 हून अधिक नागरिकांचा मृत्यू

युक्रेनच्या धान्य साठ्यावर रशियाचा हल्ला

संयुक्त राष्ट्राने वाटाघाटी केलेल्या ब्लॅक सी सेफ ग्रेन कॉरिडॉर करारातून रशियाने माघार घेतली. तेव्हापासून रशिया युक्रेनच्या त्या भागात क्षेपणास्त्र हल्ले करत आहे, जिथून युक्रेन धान्य आयात करतो.

युक्रेनमधील सदर्न मिलिटरी कमांडच्या प्रवक्त्या नतालिया गुमेन्युक यांनी सांगितले की, रशियाला आम्हाला मिळत असलेली रसद बंद करायची आहे, त्यामुळेच सातत्याने हल्ले होत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com