युक्रेन आणि रशियामधील युद्ध तीव्र होत आहे. आज युद्धाचा सातवा दिवस आहे. जर तिसरे महायुद्ध झाले तर त्यात अण्वस्त्रांचा वापर होणार असल्याचे रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले आहे. रशियाची (Russia) सरकारी मीडिया स्पुतनिकने ही माहिती दिली आहे. युक्रेनमध्ये बॉम्बहल्ला होत असताना रशियन लष्कराने युक्रेनमधील खुरासान शहरावर ताबा मिळवल्याचा दावा केला आहे. (Russia warns of nuclear weapons if World War III breaks out)
लॅव्हरोव्ह म्हणाले, युक्रेनने (Ukraine) अण्वस्त्रे घेतल्यास रशियाला "खरा धोका" असेल. रशियाने गेल्या आठवड्यात युक्रेनविरुद्ध विशेष लष्करी कारवाईची घोषणा केली होती.
दरम्यान, रशियाने युक्रेनच्या राजधानीसह अनेक महत्त्वाच्या शहारांना लक्ष केले आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी अमेरिकेकडे मदत मागितली असून, शक्य तितक्या लवकर "आक्रमण" थांबवणे आवश्यक आहे. दुसरीकडे, रशियन सैन्याने युक्रेनमधील खेरसन ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेन्कोव्ह यांनी माध्यमाशी बोलताना म्हटले की, "रशियन सशस्त्र दलांनी खेरसनमधील प्रादेशिक केंद्रावर पूर्णपणे ताबा मिळवला आहे."
त्याचबरोबर अमेरिकेसह अनेक पाश्चिमात्य देशांनी रशियावरील आर्थिक निर्बंध अधिक कडक केले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियन विमानांना अमेरिकन हवाई हद्द वापरण्यास बंदी घातली आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर कॅनडा आणि इतर काही युरोपीय देशांनीही रशियन विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.