Ukraine: Indian Embassy
Ukraine: Indian EmbassyDainik Gomantak

Russia Ukraine War: कीव मधील भारतीय दूतावास झाले बंद

यातच आता युक्रेनची (Ukraine) राजधानी असणाऱ्या कीवमधील भारतीय दूतावास बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
Published on

युक्रेनची (Ukraine) राजधानी असणाऱ्या कीवमधील भारतीय दूतावास बंद करण्यात आले आहे. दरम्यान असे मानले जात आहे की, ते जवळच्या लीव्ह शहरात हलविले जाऊ शकते. यासंबंधीची माहिती देण्यात आली आहे. रशियाने (Russia) राजधानी कीवला वेढा घातला असून सातत्याने गोळीबार सुरु आहे. कीव व्यतिरिक्त खार्किव शहरातही रशियाकडून हल्ले होत आहेत. (The Indian embassy in Kyiv the capital of Ukraine, has been closed)

Ukraine: Indian Embassy
Russia Ukraine War: जोपर्यंत युक्रेन झुकणार नाही, तोपर्यंत हल्ले सुरूच राहतील

दरम्यान, कीवमधील भारतीय दूतावासात एकही भारतीय शिल्लक नसल्याची खात्री केल्यानंतर बंद करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. कीव हे रशियाच्या सर्वात मोठ्या हल्ल्याचे बळी ठरले आहे. रशियन लष्कर शहरातील निवासी इमारती आणि प्रशासकीय इमारतींनाही लक्ष्य करत आहे. युक्रेनमधील (Ukraine) भारतीय दूतावासातील राजदूत आणि इतर कर्मचारी युद्धग्रस्त देशातील पश्चिम भागाकडे निघाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com