रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा धोका आता झपाट्याने वाढत आहे. दोन्ही देशांमधील वादामुळे आता जगभरातील देश त्यांच्या नागरिकांसाठी अॅडव्हायजरी जारी करत आहेत. सध्या कॅनडाने आपल्या नागरिकांना रशिया आणि युक्रेनमध्ये जाणाऱ्या प्रवास्यांना अनावश्यक प्रवास रद्द करण्याचा सल्ला दिला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशाचा संदर्भ देत म्हटले आहे की, रशिया (Russia)आणि युक्रेनमधील वाढता वाद लक्षात घेता, कॅनडाच्या सरकारने आपल्या नागरिकांना या देशांमध्ये प्रवास न करण्याचे सांगितले आहे.
रशियाने युक्रेन सीमेवर 1 लाख सैनिक तैनात केले आहेत. अमेरिकेसह अनेक देशांनी व्यक्त केली आहे की, रशिया युक्रेनवर हल्ला करू शकतो. त्यामुळे अमेरिकेने सुध्दा आपल्या नागरिकांना युक्रेन सोडण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय अमेरिका युक्रेनमधील कीव येथून आपला दूतावास रिकामा करत असल्याच्याही बातम्या आहेत. रशिया आणि युक्रेनमधील या वाढत्या तणावामुळे महासत्तांमधील युद्धाचा धोकाही वाढला आहे. अमेरिकेने (United Stetas) याआधीच रशियाला संभाव्य युद्धाचा इशारा दिला आहे. तर दुसरीकडे ब्रिटन आणि कॅनडानेही युक्रेनला लष्करी मदत आणि युद्धसामग्री देण्यास सुरुवात केली आहे.
त्याच वेळी, मॉस्कोने युक्रेनवर हल्ला करण्याची योजना आखल्याचा दावा सातत्याने नाकारला आहे, रशियन सीमेजवळील नाटो लष्करी क्रियाकलाप त्याच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका म्हणून पाहतो. वृत्तसंस्थेनुसार, गेल्या महिन्यात अमेरिका आणि नाटोला रशियाने युरोपमधील सुरक्षा हमींचा प्रस्ताव दिला होता, ज्याला अद्याप प्रतिसाद मिळालेला नाही.
युक्रेन (Ukraine) आणि रशियामधला वाद हा काही नविन नाही. 1990 च्या दशकापर्यंत युक्रेन हा पूर्वीच्या सोव्हिएत युनियनचा प्रमुख भाग होता. मात्र सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर, युक्रेन आणि रशिया अशी ही दोन सार्वभौम राज्ये बनली. हा शीतयुद्धाचा काळ होता. या काळात सोव्हिएत युनियन आणि अमेरिका यांच्यातील तणाव हा शिगेला पोहोचला होता. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर त्यापासून वेगळे झालेल्या राज्यांनी त्यांचे स्वतंत्र परराष्ट्र धोरण स्वीकारले. मात्र, सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतरही रशिया आणि अमेरिका यांच्यातील संबंध फारसे सौहार्दपूर्ण राहिले नाही मात्र देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.