रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरु असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. दरम्यान, रशियाचे धोकादायक मनसुबे समोर आले आहेत. युक्रेनला युद्धात पराभूत करण्यासाठी रशिया नवनवीन योजना आखत आहे. असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांचे म्हणणे आहे. कीवमध्ये पत्रकारांना संबोधित करताना ते म्हणाले की, रशिया मे महिन्याच्या शेवटी किंवा उन्हाळ्यात युक्रेनवर खूप मोठा हल्ला करण्याची तयारी करत आहे. मात्र, युक्रेनने हा हल्ला हाणून पाडण्याची योजना तयार असल्याचे स्पष्ट केले.
झेलेन्स्की यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, कीव आणि त्याच्या पाश्चात्य मित्र राष्ट्रांमध्ये रशियाशी लढण्यासाठी एकजूट राहणे महत्त्वाचे आहे. मात्र, युक्रेनचा विजय पाश्चात्य देशांच्या समर्थनावर अवलंबून असल्याचा पुनरुच्चार करायला ते विसरले नाहीत. झेलेन्स्की पुढे म्हणाले की, "रशियाच्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही तयारी करत आहोत. 8 ऑक्टोबरपासून सुरु झालेल्या त्यांच्या हल्ल्याचा कोणताही परिणाम झाला नाही. आम्ही आमच्या भागासाठी योजना तयार करुन अमंलबजावणी करु."
झेलेन्स्की पुढे म्हणाले की, 'फेब्रुवारी 2022 पासून 31,000 युक्रेनियन सैनिक मारले गेले आहेत.' मात्र, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनचे आकडे खोटे ठरवून फेटाळले आहेत.
तथापि, गेल्या ऑगस्टमध्ये न्यूयॉर्क टाईम्सच्या अहवालात अमेरिकन अधिकाऱ्यांचा हवाला देऊन युक्रेनमधील मृतांची संख्या सुमारे 70,000 आहे. याच अहवालात असे म्हटले आहे की, युद्धादरम्यान 120,000 रशियन सैनिक मारले गेले.
मात्र, या आकडेवारीची स्वतंत्रपणे पडताळणी होऊ शकली नाही. रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांनी अनेकदा युद्धात त्यांच्या लष्करी जीवितहानीला कमी लेखले आहे, तर त्यांनी एकमेकांच्या झालेल्या नुकसानीची अतिशयोक्ती केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.