Russia-Ukraine War: झेलेन्स्की यांना मोठा झटका! युक्रेनचे आणखी एक शहर रशियन सैन्याने घेतले ताब्यात...

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता, एक मोठी बातमी समोर आली आहे.
Russia-Ukraine War
Russia-Ukraine WarDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन यांच्यातील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. यातच आता, एक मोठी बातमी समोर आली आहे. युद्धाला दोन वर्षे पूर्ण होण्यापूर्वी रशियन सैन्याने आणखी एक युक्रेनमधील शहर ताब्यात घेतले आहे. युक्रेनने अवदिव्का येथून आपले सैन्य मागे घेतले आहे. शस्त्रास्त्रे आणि दारुगोळ्याच्या कमतरतेमुळे युक्रेनच्या सैन्याला माघार घ्यावी लागली असल्याचे सांगण्यात येत आहे.

अमेरिका आणि नाटोसह अनेक युरोपीय देशांच्या मदतीनंतरही युक्रेनचे दुसरे शहर ताब्यात घेणे हा रशिया आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा मोठा विजय मानला जात आहे. यामुळे अमेरिका (America) आणि युरोपीय देशांना मोठा धक्का बसला आहे. रशियाने बखमुत ताब्यात घेतल्यापासून कीवच्या सैन्यासाठी ही सर्वात हाय-प्रोफाइल माघार आहे. लष्करी मदतीच्या कमतरतेमुळे युक्रेनियन कमांडर्सना दारुगोळ्याच्या कमतरतेमुळे माघार घ्यावी लागली आहे.

Russia-Ukraine War
Russia-Ukraine War: युक्रेनने रशियाच्या 'या'शहरावर केला आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; पुतीन यांना झटका!

दरम्यान, रशियन सैन्यांशी अनेक महिन्यांच्या तीव्र लढाईनंतर, युक्रेनियन सैन्याने अवदिव्का या प्रभावित शहरातून माघार घेतली आहे, असे सशस्त्र दलाच्या कमांडरने शनिवारी सांगितले. या विजयामुळे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची मॉस्कोवरील पकड आणखी मजबूत होईल, कारण रशियात लवकरच राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत.

रशियन सैन्याने घेरल्यानंतर युक्रेनियन सैन्यांची माघार

युक्रेनच्या (Ukraine) सशस्त्र दलाचे कमांडर-इन-चीफ कर्नल जनरल ऑलेक्झांडर सिर्स्की म्हणाले की, "वेढा टाळण्यासाठी आणि सैनिकांसाठी त्यांनी माघार घेण्याचे आदेश दिले. कारण युक्रेनियन सैन्यांना रशियन सैन्याने पूर्णपणे वेढा घातला होता. मी शहरातून माझे युनिट्स मागे घेण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी जाण्याचा निर्णय घेतला आहे." सिर्स्की यांनी शनिवारी स्थानिक वेळेनुसार फेसबुकवर दिलेल्या निवेदनात त्यांनी हे म्हटले.

गेल्या मे मध्ये युक्रेनच्या पूर्वेकडील शहर बाखमुत, अवदिव्काच्या उत्तरेला अवघ्या 30 मैलांवर रशियन सैन्याने कब्जा केला होता. मात्र या शहराला फारसे धोरणात्मक महत्त्व नसले तरी युक्रेनला पाश्चिमात्य मदत आणि दारुगोळा यांचा तुटवडा असताना कीवला मदत करण्यासाठी युरोपीय देशांवर दबाव वाढू शकतो.

Russia-Ukraine War
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला, रशियन तेल डेपोचे मोठे नुकसान; पारंपारिक उत्सव रद्द!

लष्कराची कमान हाती घेताच सिर्स्की यांना पहिला पराभव पत्करावा लागला

दरम्यान, एक आठवड्यापूर्वी सिर्स्की यांना युक्रेनचे नवीन कमांडर-इन-चीफ म्हणून नियुक्त करण्यात आले होते. "भिन्न दृष्टीकोन" आणण्याच्या आणि युद्धभूमीवर गोष्टी बदलण्याच्या आशेने अध्यक्ष झेलेन्स्की यांनी सिर्स्की यांनी आणले.

पण त्यांच्या नेतृत्वाखालील युक्रेनियन सैन्याने अवदिव्का येथून माघार घेतल्याने कीवचे मनोधैर्य आणखी खचले आहे. "आम्ही परिस्थिती स्थिर करण्यासाठी आणि आमची पोझिशन राखण्यासाठी योग्य ती पाऊले उचलत आहोत," असे युक्रेनियन सैन्याने माघार घेतल्याची घोषणा करताना सिर्स्की म्हणाले. तसेच, त्यांनी पुन्हा युद्धाच्या मैदानात उतरण्याची शपथ घेतली. सिर्स्की यांच्या सैन्याने माघार घेण्यापूर्वी घुसखोरीचा प्रयत्न केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Trump Signs Sanctioning Russia & Iran Act 2026
AI Chatbot False Intelligence Report US China War
US Iran War End Donald Trump Peace Deal Statement
US Iran War Pentagon Audit Report 2026
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com