Russia-Ukraine War: 100 दिवसांत हजारो नागरिकांचा मृत्यू, ही आहे संपूर्ण Timeline

रशियाने (Russia) 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला केला. हे युरोपमधील अनेक दशकांतील सर्वात वाईट सुरक्षा संकट आहे.
Russia-Ukraine War
Russia-Ukraine WarDainik Gomantak
Published on
Updated on

रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला केला. हे युरोपमधील अनेक दशकांतील सर्वात मोठे सुरक्षा संकट आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला 100 दिवस पूर्ण झाल्यानंतर आता रशिया युक्रेनच्या पूर्वेकडील भागात आपली पकड मजबूत करत आहे. या 100 दिवसांत हजारो नागरिकांचा मृत्यू झाला असून अनेक शहरे उध्दवस्त झाली आहेत. (russia ukraine war 100 days this is the full timeline of the devastation)

24 फेब्रुवारी: रशियन आक्रमण

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Russian President Vladimir Putin) यांनी माजी सोव्हिएत देशाचे "असैनिकीकरण" करण्यासाठी आणि "नाझी सैन्याला" नष्ट करण्यासाठी विशेष लष्करी कारवाईची घोषणा केली. युक्रेनमधील रशियन भाषिक लोकांचे संरक्षण करणे हा देखील त्यांचा उद्देश होता. रशियाने अनेक युक्रेनियन शहरांवर पूर्ण ताकदीनिशी हल्ले केले. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी युक्रेन न सोडण्याची आणि प्रतिकार करण्याचे वचन दिले.

Russia-Ukraine War
Russia-Ukraine War: भारतीय दूतावास पुन्हा होणार कार्यरत

26 फेब्रुवारी : अनेक मोठे निर्बंध

पाश्चात्य देशांनी रशियावर (Russia) अनेक कठोर निर्बंध लादले आणि युक्रेनला (Ukraine) लष्करी मदत देऊ केली. त्याचबरोबर त्यांनी हवाई क्षेत्र रशियन विमानांसाठी बंद केले. रशियाची अनेक बड्या क्रिडा स्पर्धांमधून हकालपट्टी करण्यात आली.

27 फेब्रुवारी: अण्वस्त्राचा धोका

पुतिन यांनी रशियाच्या आण्विक शक्तीला हाय अलर्टवर ठेवले आहे. युक्रेनमध्ये हस्तक्षेप न करण्याचा इशारा म्हणून याकडे पाहिले जात होते.

Russia-Ukraine War
Russia-Ukraine War: 'अचानक', अमेरिकेची फर्स्ट लेडी युध्दग्रस्त युक्रेनमध्ये !

- 28 फेब्रुवारी: पहिली चर्चा

युक्रेन आणि मॉस्कोमध्ये पहिल्यांदाच शांतता चर्चा झाली. यामध्ये रशियाने क्रिमियाच्या सार्वभौमत्वाला मान्यता देण्याची आणि युक्रेनच्या निशस्त्रीकरणाची मागणी केली. त्याचबरोबर युक्रेनने कधीही नाटोमध्ये सामील होणार नाही अशी हमी द्यावी. युक्रेनने रशियाला युक्रेनमधून आपले सैन्य पूर्णपणे काढून घेण्यास सांगितले.

3 मार्च, खोरासनचा पराभव

रशियन सैन्याने युक्रेनच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर हल्ला केला आणि रशिया समर्थक बंडखोरांच्या ताब्यात असलेल्या प्रदेशासह क्रिमियाला जोडण्याचा प्रयत्न केला. 3 मार्च रोजी, खोरासन प्रांत रशियाने ताब्यात घेतला. रशियन सैन्याने मारियुपोलवर बॉम्ब हल्ला करण्यास सुरुवात केली.

Russia-Ukraine War
Russia Ukraine War: रशिया 9 मेनंतर युद्ध संपण्याची घोषणा करणार?

4 मार्च : माध्यमांवर हल्ला

रशियाने युक्रेनवरील हल्ल्याबद्दल कोणत्याही "फेक न्यूज" ला शिक्षा देण्यासाठी कायदा पास केला. रशियामध्ये, जर याला "आक्रमण" न म्हणता "विशेष लष्करी ऑपरेशन" म्हटले तर त्याला 15 वर्षे तुरुंगवास होऊ शकतो.

16 मार्च: मारियुपोलचे थिएटर ग्राउंड झाले

रशियन हवाई हल्ल्यात मारियुपोल शहरातील थिएटरमध्ये जीव वाचवण्यासाठी लपलेले 300 लोक मारले गेले. मॉस्कोने याचा दोष युक्रेनच्या राष्ट्रवादी अझोव्ह बटालियनवर ठेवला. या दिवशी झालेन्स्की यांनी अमेरिकन संसदेला पर्ल हार्बरची आठवण करुन दिली.

Russia-Ukraine War
Russia-Ukraine War: 'रशियाला मदत केल्यास...,' अमेरिकेने दिली चीनला धमकी

2-3 एप्रिल: बूचा क्रूरता

युद्धानंतर सुमारे एक महिन्यानंतर, रशियाने उत्तर युक्रेनमधून माघार घेण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर रशियाने घोषणाही केली की, आता पूर्वेकडील डॉनबास प्रदेश जिंकण्यावर लक्ष केंद्रीत केले जाईल. 2-3 एप्रिल रोजी, युक्रेनियन लोकांना राजधानी कीवजवळील बुचा गावाच्या रस्त्यावर नागरिकांचे मृतदेह पडलेले आढळले. ते रशियन सैन्याने ताब्यात घेतले.

8 एप्रिल: रेल्वे स्टेशन उडवले

पूर्वेकडील क्रामाटोर्स्क शहरातील रेल्वे स्टेशनवर हल्ला करण्यात आला. इथे डॉनबासमधून पळून गेलेल्या 57 नागरिकांचा मृत्यू झाला.

- 12 एप्रिल: बायडन म्हणाले, 'नरसंहार'

बायडन यांनी रशियावर 'नरसंहार' केल्याचा आरोप केला, बायडन म्हणाले की, पुतिन यांना युक्रेनची ओळख पुसून टाकायची आहे.

14 एप्रिल: फ्लॅगशिप जहाज बुडाले

युक्रेनियन क्षेपणास्त्राने ब्लॅक सीमध्ये रशियन युद्धनौका मॉस्क्वाला लक्ष्य केले आणि ते बुडवले, हे रशियाचे मोठे नुकसान होते.

11 मे: यूएस 40 अब्ज डॉलर्सची मदत

यूएस खासदारांनी युक्रेनसाठी लष्करी, आर्थिक आणि मानवतावादी मदतीचे $40 अब्ज पॅकेज मंजूर केले.

Russia-Ukraine War
Russia-Ukraine war : युक्रेनमधील युद्धात किमान 1,276 नागरिक ठार, 1,981 जखमी

16 मे: खार्किवमधून परतणे

युक्रेनने म्हटले आहे की, आमच्या सैन्याने खार्किवमधून रशियन सैन्याला हुसकावून लावले आणि त्यांना रशियन सीमेवर पाठवले.

- 18 मे: स्वीडन, फिनलंडने नाटोसाठी अर्ज केला

युक्रेनवर रशियाच्या आक्रमणामुळे, फिनलंड आणि स्वीडनने अनेक दशकांचे लष्करी अलाइनमेंट सोडून नाटोमध्ये सामील होण्यासाठी अर्ज केला.

23 मे: युद्ध गुन्ह्यातील पहिली शिक्षा

युक्रेनियन कोर्टाने 21 वर्षीय रशियन सैनिकाला युद्ध गुन्ह्यांबद्दल दोषी ठरवले आणि 62 वर्षीय नागरिकाची हत्या केल्याबद्दल त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

- 21 मे: मारियुपोलची लढाई संपली

रशियाने घोषित केले की, आम्ही मारियुपोल पूर्णपणे ताब्यात घेतले आहे. युक्रेनने अझोवेस्टल येथील स्टील कारखान्यातील आपल्या सैनिकांना युक्रेनियन सैन्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले.

Russia-Ukraine War
Russia-Ukraine War : युद्धात आतापर्यंत 16,600 रशियन सैनिक मारले गेले

मे 30: युरोपियन युनियनने बहुतेक रशियन तेलांवर निर्बंध लादले

युरोपियन युनियनच्या नेत्यांनी, हंगेरीच्या प्रतिकारावर मात करुन, रशियाची जवळजवळ सर्व तेल आयात अंशतः किंवा पूर्णपणे थांबवली. करारानुसार, टँकरद्वारे आयात केलेले तेल प्रतिबंधित आहे, परंतु हंगेरीसारखे भूपरिवेष्टित देश ते रशियन तेल पाइपलाइनमधून घेऊ शकतात.

31 मे: रशियाने पूर्वेकडील शहराचा काही भाग ताब्यात घेतला

रशियन सैन्याने पूर्व युक्रेनियन शहर सेवेरोडोनेत्स्कचा काही भाग ताब्यात घेतला. हे शहर घेतल्याचा अर्थ असा होतो की, डोनबासच्या दोन प्रदेशांपैकी एक आणि युक्रेनचे औद्योगिक केंद्र असलेल्या लुहान्स्कचा ताबा रशियाला आपोआप मिळेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com