अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायाधीश पदासाठी कृष्णवर्णीय महिलांना मिळणार संधी?

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयातील रिक्त जागा भरण्यासाठी देशाचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या यादित तीन कृष्णवर्णीय महिला न्यायमूर्तींची नावे आहेत. बायडन यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
Joe Biden
Joe BidenDainik Gomantak
Published on
Updated on

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन देशाच्या सर्वोच्च न्यायालयात पहिल्या कृष्णवर्णीय महिलेला न्यायाधीश करण्याच्या वचनपूर्ती साठी तयार आहेत. सर्वोच्च न्यायालयातील संभाव्य रिक्त जागा भरण्यासाठी ते किमान तीन कृष्णवर्णीय महिला न्यायमूर्तींची नावे पाहत आहेत. बायडेन यांच्या निकटवर्तीयांनी बुधवारी ही माहिती दिली आहे.

Joe Biden
राणी एलिझाबेथला तुरुंगात टाकले जाऊ शकते? जाणून घ्या

व्हाईट हाऊसच्या (White House) चार अधिकाऱ्यांनी न्यायमूर्ती स्टीफन ब्रेयर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून निवृत्त होणार आहेत असे सांगितले आहे. त्यांचा उत्तराधिकारी निवडीबद्दल प्राथमिक चर्चा सर्किट न्यायाधीश कॅटान्झी ब्राउन जॅक्सन, जिल्हा न्यायाधीश जे. मिशेल चाइल्ड्स आणि कॅलिफोर्निया सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश लिओनांद्र क्रुगर यांच्यावर केंद्रित आहे. जॅक्सन आणि क्रुगर यांना दीर्घकाळसाठी म्हणून पाहिले जात आहे.

जो बायडेन (Joe Biden) यांनी जानेवारी 2021 मध्ये पदभार स्वीकारल्यापासून वेगवेगळ्या समुदायातील न्यायाधीशांना फेडरल बेंचवर नामनिर्देशित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. फेडरल कोर्ट ऑफ अपीलमध्ये पाच कृष्णवर्णीय महिला न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात त्यांना यश आले आहे, तर तीन अतिरिक्त नामांकन सिनेटमध्ये प्रलंबित आहेत. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) नियुक्तीसाठी कृष्णवर्णीय महिलेचे नामांकन होण्याची शक्यता खूप जास्त प्रमाणात दिसून येत आहे.

डेरिक जॉन्सन, नागरी हक्क संघटनेचे अध्यक्ष नॅशनल असोसिएशन फॉर द अॅडव्हान्समेंट ऑफ कलर्ड पीपल म्हणाले की, योग्य स्पर्धक निवडण्यासाठी बिडेन यांच्याकडे पुरेसे पर्याय आहेत. सर्वोच्च न्यायालयात नागरी हक्कांची भक्कम नोंद असलेल्या व्यक्तीची नियुक्ती करण्याची ही एक ऐतिहासिक संधी आहे. व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रपतीपदाच्या कार्यकाळाचे पहिले वर्ष पूर्ण होईपर्यंत बायडेन यांनी नामनिर्देशित केलेल्या 40 न्यायाधीशांची नावे संसदेकडून घेतली जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com