Russia Ukraine War: 20 हवाई हल्ले आणि 60 रॉकेट डागून रशियाने युक्रेनचे शहर केले बेचिराख

स्वत: राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Russia Ukraine War
Russia Ukraine WarDainik Gomantak
Published on
Updated on

Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये मागील अनेक दिवसांपासून भीषण युद्ध सुरू आहे. हे युद्ध आता धोकादायक टप्प्यावर पोहोचले आहे. रशिया सतत हवाई हल्ले करून युक्रेनला कोमजोर करण्याची कोणतीही कसर सोडत नाही आहे. दरम्यान, रशियाने आपल्या हवाई हल्ल्यात युक्रेनच्या बाखमुत शहराला बेचिराख केले आहे, स्वत: राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Russia Ukraine War
Madhya Pradesh: दोन्ही हात तोडून बापानेच केली 15 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, विचित्र कारण आले समोर

रशियाच्या हल्ल्यात युक्रेनच्या डोनेस्क, लुहान्स्क प्रांतातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. बाखमुट, सोलेदार, मेरींका आणि क्रेमिन्ना या शहरांमध्ये रशियाने केलेल्या हल्ल्यामुळे कोणतीही जागा शिल्लक राहिलेली नाही.

रशियाने शुक्रवार आणि शनिवारी सलग दोन दिवसांत सुमारे 20 हवाई हल्ले आणि 60 रॉकेट डागल्याची माहिती युक्रेनच्या लष्कराने दिली आहे. यामध्ये 2 सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला असून 8 जण गंभीर जखमी झाले आहेत.

Russia Ukraine War
Pernem: कासारवर्णे, चांदेल-हसापुर, हळर्ण-तळर्ण ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर; वाचा सविस्तर निकाल

रशियाने कामिकाझे ड्रोनने रात्री उशिरा युक्रेनवर हल्ला केला. यामुळे ओडेसामधील वीजपुरवठा खंडीत झाला असून, सुमारे 1.5 दशलक्ष लोकांना वीजविना अंधारात जगावे लागत आहे. ओडेसा व्यतिरिक्त, युक्रेनमधील खार्किव, सुमी, निप्रोपेत्रोव्स्क, झापोरिझिया आणि खेरसन येथेही हवाई हल्ले तीव्र केले आहेत. युक्रेनने देशद्रोहाच्या आरोपाखाली 130 लोकांना अटक केली आहे. देशद्रोह्यांची माहिती देण्यासाठी खरसनभर पोस्टर लावण्यात आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com