भारतानंतर बांगलादेशात वादग्रस्त वक्तव्यांचं पेव, हसीना सरकारवर दबाव

भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मदांबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरुन वाद वाढतच चालला आहे.
Sheikh Hasina
Sheikh HasinaDainik Gomantak
Published on
Updated on

भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मदांबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्यावरुन वाद वाढतच चालला आहे. नुपूर शर्मांवर करण्यात आलेल्या कारवाईवरुन मुस्लिम समाजातून टीका होत आहे. शुक्रवारी अनेक राज्यांमध्ये यासंदर्भात हिंसाही झाली. (Ruling Awami League Leader Says Bangladesh Government Under Pressure To Act On Prophet Remarks Row)

दरम्यान, शेजारील बांगलादेशातही (Bangladesh) याप्रकरणी कारवाईसाठी सरकारवर दबाव आहे. बांगलादेशातील सत्ताधारी पक्ष असलेल्या अवामी लीगच्या एका नेत्याने याची कबुली देत​निवेदन दिले आहे. या मुद्द्यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, 'बांगलादेशातील बहुसंख्य लोक मुस्लिम आहेत, देशात कार्यरत असलेल्या विघटनकारी शक्ती अशा परिस्थितीचा फायदा घेऊन समाजात विकृती निर्माण करण्याचा प्रयत्न करु शकतात.'

Sheikh Hasina
बांगलादेशात भारत सरकार विरोधात घोषणाबाजी

सरकारवर कारवाईसाठी दबाव वाढतोय

बांगलादेशातील सत्ताधारी अवामी लीगच्या धार्मिक व्यवहार उपसमितीचे अध्यक्ष आणि सल्लागार समितीचे सदस्य खंडकर गौलम मौला नक्शबंदी यांनी ढाकामध्ये भारतीय पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 'बांगलादेशातील उलेमा, सुफी आणि नागरी संघटना पैगंबर यांच्या विरोधात वक्तव्य करत आहेत.'

भारत-बांगलादेश मित्र आहेत, पण...

खंडकर गौलम मौला नक्शबंदी म्हणाले की, ''आंतरराष्ट्रीय स्तरावरील षडयंत्र आणि स्थानिक पातळीवरील क्षुल्लक राजकारणामुळे अनेक वेळा समस्या उद्भवतात. परंतु त्यावर ताबडतोब कारवाई करणे आवश्यक असते. कारवाईस विलंब झाल्यास परिस्थिती आणखी बिघडते.''

Sheikh Hasina
पाकिस्तानचं नवं सरकार ड्रॅगनला देणार मोठा दणका! CPEC प्रोजेक्टच्या विरोधात मोहीम

यावेळी ते पुढे म्हणाले की, 'भारत (India) बांगलादेशचा मित्र आहे. कठीण प्रसंगी भारत अनेकवेळा आपल्या मदतीला धावून आला आहे. जरी ही प्रामुख्याने भारताची खाजगी बाब आहे, परंतु अशा घटनांचा बांगलादेशातील नागरिकांवरही परिणाम होतो.' प्रतिक्रिया देताना ते पुढे म्हणाले की, 'अशी वक्तव्ये टाळावीत, त्यामुळे कोणाच्याही भावना दुखावू शकतात.'

भाजप नेत्यांवर उशिरा कारवाई

खंडकर गौलम मौला नक्शबंदी म्हणाले की, 'या प्रकरणी भारतातील भाजप नेत्यांवर जी काही कारवाई झाली त्याला खूप उशीर झाला.' यावेळी त्यांनी दावा केला की, आखाती देशांच्या दबावामुळे भारतात ही कारवाई करण्यात आली. ते पुढे म्हणाले की, 'हसीना सरकार परिस्थिती समजून घेत आहे. यासंदर्भात विचारविनिमय केल्यानंतरच निवेदन जारी केले जाईल. अनेक आंतरराष्ट्रीय शक्ती भारत आणि बांगलादेशमधील संबंध बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे खरं आहे.'

Sheikh Hasina
खबरदार सरकार विरोधात बोलाल तर...चीनचा 'महिला' तिरस्कार

भारतातील अनेक शहरांमध्ये गोंधळ

विशेष म्हणजे, शुक्रवारच्या नमाजानंतर प्रेषित मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन अनेक शहरांमध्ये गदारोळ झाला होता. या काळात निदर्शने, हिंसाचार, दगडफेक, जाळपोळ अशा घटनाही घडल्या. उत्तर प्रदेशातील प्रयागराज, झारखंडमधील (Jharkhand) रांची आणि पश्चिम बंगालमधील हावडामध्ये सर्वाधिक गदारोळ झाला.

दुसरीकडे, प्रयागराजमध्ये, दगडफेकीत आयजीसह 18 पोलीस कर्मचारी जखमी झाले. एसएसपी आणि डीएमही जखमी झाले. झारखंडची राजधानी रांचीमध्ये हिंसाचारात 25 जण जखमी झाले. पोलिसांच्या गोळीबारात दोन हल्लेखोरांचाही मृत्यू झाला आहे. संपूर्ण शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. हावडामध्ये शुक्रवारी सुरु झालेला गोंधळ शनिवारीही सुरुच राहीला आहे. इथे हल्लेखोरांनी केलेल्या दगडफेकीत 15 हून अधिक पोलीस जखमी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com