खबरदार सरकार विरोधात बोलाल तर...चीनचा 'महिला' तिरस्कार

अलीकडेच चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचे आरोप करणारी टेनिसपटू पेंग शुआई बेपत्ता झाल्याची बातमी चर्चेत होती.आता UNने चिनी महिला पत्रकार झांग झान यांच्या छळावर चिंता व्यक्त केली आहे.
China is unsecure country foe women's
China is unsecure country foe women's Dainik Gomantak
Published on
Updated on

भारतासोबतच्या सीमावादात अडकलेला चीन (China) त्याच्या आक्रमकतेसाठी प्रसिद्ध आहे. त्यांची ही आक्रमकता देशाबाहेरच नाही तर देशाच्या आतही दिसून येत आहे. चीनमध्ये कम्युनिस्ट पक्षाविरुद्ध (Chinese Communist Party) आवाज उठवणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाते हे देखील जगजाहीर आहे. अलीकडेच चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचे आरोप करणारी टेनिसपटू पेंग शुआई बेपत्ता झाल्याची बातमी चर्चेत होती.आता संयुक्त राष्ट्राने चिनी महिला पत्रकार आणि माजी वकील झांग झान यांच्या छळावर चिंता व्यक्त केली आहे. पेंग आणि झांगच्या बाबतीत चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या हुकूमशाहीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष बाब म्हणजे अमेरिका आणि पाश्चात्य देश चीनला मानवाधिकारांचे उल्लंघन आणि कोरोनाच्या उत्पत्तीबाबत प्रश्न विचारत असताना चीनच्या कम्युनिस्ट पक्षावर हे आरोप केले जात आहेत.(China is unsecure country foe women's)

कोरोनाच्या प्रसारासाठी अमेरिका चीनला दोषी ठरवत असताना संयुक्त राष्ट्राने झांगबाबत ही चिंता व्यक्त केली आहे.बायडन प्रशासन या प्रकरणात त्याच्या पूर्ववर्ती ट्रम्प प्रशासनाचे अनुसरण करीत आहे. चीन सरकार निष्पक्ष तपासात अडथळा आणत असल्याचा आरोप अमेरिकेने वारंवार केला आहे.या प्रकरणात झांगचे प्रकरण अधिक गंभीर होऊ शकते. झांग ह्या व्यवसायाने पत्रकार आहेत. कोरोना महामारीच्या काळात त्या चीनच्या वुहान शहरात रिपोर्टिंग करत होत्या. त्यांच्या अहवालावर चीनची कम्युनिस्ट पार्टी नाराज होती. चीन सरकारने झांगला तुरुंगात टाकल्यावर अन्यायाच्या निषेधार्थ तिने तुरुंगात उपोषण केले. आता त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक आहे.

फेब्रुवारी 2020 मध्ये, 38 वर्षीय झांग झान यांनी वुहानमधील साथीच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले होते झांगने कदाचित त्याचा व्हिडिओही बनवला असेल. अहवाल सादर केल्यानंतर, त्यांना मे 2020 मध्ये ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर सरकारी कामकाजात अडथळा आणल्याबद्दल झांगला चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. झांग यांनी ट्विटरवर लिहिले होते की, येत्या हिवाळ्यात मी कदाचित जिवंत नसेल.त्यांच्या ट्विटरनंतर आंतरराष्ट्रीय संस्था सक्रिय झाल्या आहेत. मानवाधिकार संघटना अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने गुरुवारी चीन सरकारला झांगची तात्काळ सुटका करण्याचे आवाहन केले. ऍम्नेस्टीचे प्रचारक ग्वेन ली यांनी एका निवेदनात म्हटले आहे की झांगची नजरकैद "मानवाधिकारावरील लज्जास्पद हल्ला" आहे.

China is unsecure country foe women's
पाकिस्तान दहशतवाद्यांच्या मदतीने बांगलादेशला अस्थिर करतंय

अलीकडेच चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यावर लैंगिक छळाचे आरोप करणारी टेनिसपटू पेंग शुआई बेपत्ता झाल्याची बातमी चर्चेत आहे. पेंग गायब झाल्याने पुन्हा एकदा कम्युनिस्ट पार्टी ऑफ चायना चर्चेत आली आहे. पेंग हिने माजी उपाध्यक्ष आणि कम्युनिस्ट पक्षाच्या सर्वात शक्तिशाली पॉलिटब्युरो स्थायी समितीचे सदस्य झांग गाओली यांच्यावर छळाचा आरोप केला आहे . 2013 मध्ये विम्बल्डन आणि 2014 मध्ये फ्रेंच ओपनमध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावणाऱ्या माजी जागतिक नंबर वन पेंगनेही तीन वेळा ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आहे. बीजिंगमध्ये ४ फेब्रुवारीपासून हिवाळी खेळ सुरू होणार आहेत आणि या संदर्भात पेंग बेपत्ता झाल्याची आणखी चर्चा झाली आहे.2 नोव्हेंबर रोजी, पेंग प्रकाशझोतात आली जेव्हा तिने तिच्या छळाची सोशल मीडियावर एक लांब पोस्ट लिहिली.

चीनमध्ये आणखी अनेक प्रसिद्ध महिला गायब झाल्या आहेत. सन 2017 मध्ये चिनी व्यावसायिक महिला वेहांग देखील बेपत्ता झाली होती. वेहांग यांच्या पतीने चीनमधील श्रीमंत वर्गातील भ्रष्टाचार उघड केला होता.राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची निंदा केल्यानंतर रिअल इस्टेट व्यावसायिक रेन झिकियांग मार्च 2020 मध्ये बेपत्ता झाले. यानंतर त्यांना भ्रष्टाचार प्रकरणात गोवण्यात आले आणि 18 वर्षांची शिक्षा झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com