Social Media Viral Video
Viral VideoDainik Gomantak

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

Social Media Viral Video: सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक 5 वर्षांची चिमुकली आपल्या 3 वर्षांच्या लहान भावासाठी ढाल बनून वडिलांसमोर उभी राहिली.
Published on

Social Media Viral Video: सोशल मीडियाच्या रंगीबेरंगी दुनियेत दररोज अनेक कहाण्या समोर येतात, पण काही कहाण्या अशा असतात, ज्या केवळ हसूच नाही तर डोळे पाणावतात आणि मनाला स्पर्श करुन जातात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक 5 वर्षांची चिमुकली आपल्या 3 वर्षांच्या लहान भावासाठी ढाल बनून वडिलांसमोर उभी राहिली.

आधी हा व्हिडिओ पाहा!

Social Media Viral Video
Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

चिमुकल्याची चूक आणि वडिलांची ओरड

दरम्यान, व्हिडिओची सुरुवात एका लहान मुलाच्या (Child) निरागस खोडीने होते. अवघ्या 3 वर्षांच्या त्या मुलाने माती खाल्ली, त्यामुळे प्रत्येक पालकांप्रमाणे, त्याचे वडील त्याला प्रेमाने ओरडतात. वडील मोठ्या आवाजात विचारतात, "तू माती का खाल्ली?" माती खाल्ल्याने पोटात जंतू होतात, असे ते त्याला समजावून सांगत असतानाच तिथे उपस्थित असलेली त्याची 5 वर्षांची मोठी बहीण आपल्या भावाच्या बचावासाठी पुढे येते.

"बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!"

त्या चिमुकलीच्या आवाजात ना भीती आहे, ना कोणताही बनावटपणा. ती सरळसरळ म्हणते, "बाबा, माझ्या भावाला ओरडू नका आणि मारुही नका." तिच्या बोलण्यात एक निरागस धैर्य आहे, जे ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनाला भिडते. जेव्हा वडील तिला समजावण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ती आपल्या लहान भावाला मिठी मारते आणि म्हणते, "मी याला माझ्याजवळ ठेवीन, तुम्ही त्याला ओरडू नका."

Social Media Viral Video
Viral Video: श्रेयंका पाटील आणि सूर्या दादाचा हटके अंदाज! 'ऑरा फार्मिंग' वर केला भन्नाट डान्स; व्हिडिओ तुफान व्हायरल

इंटरनेटवर प्रेमाचा वर्षाव

हा व्हायरल व्हिडिओ सोशल साइट 'एक्स'वर (@Ghar ke kalesh) शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत लाखो लोकांपर्यंत पोहोचला. हा व्हिडिओ पाहून लोक भावुक झाले. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्सही केल्या. एकाने लिहिले की, "काश, प्रत्येक भावाला अशी बहीण मिळावी." तर दुसऱ्याने लिहिले की, "या चिमुकलीने खरे प्रेम काय असते, हे शिकवले."

दरम्यान, या व्हिडिओमधील सर्वात मार्मिक क्षण तो आहे, जेव्हा ती चिमुकली आपल्या भावाला घट्ट मिठी मारते, जणू तिला जगातील सर्व अडचणींपासून त्याला वाचवायचे आहे. हे दृश्य केवळ भावा-बहिणीच्या नात्याची (Brother-Sister Bond) सुंदरताच दर्शवत नाही, तर प्रेम आणि संरक्षणाची भावना वयाची मोहताज नसते हेही सांगते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com