Road Side Namaz: रस्त्यावर नमाज अदा करणं 'या' मुस्लिम देशात गुन्हा, भरावा लागणार मोठा दंड

Saudi Arabia: महामार्गावर वाहने थांबवून नमाज अदा करणाऱ्यांना एक हजार दिरहमचा दंड भरावा लागेल, असे अबू धाबी पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले आहे.
Road Side Namaz
Road Side NamazDainik Gomantak
Published on
Updated on

Abu Dhabi Police: उद्यानांमध्ये किंवा रस्त्यांवर नमाज अदा केल्याच्या बातम्या तुम्ही अनेकदा ऐकल्या, वाचल्या असतील. मात्र एका मुस्लिम देशाने याबाबत कठोर भूमिका घेण्याचे जाहीर केले आहे.

महामार्गावर वाहने थांबवून नमाज अदा करणाऱ्यांना एक हजार दिरहमचा दंड भरावा लागेल, असे अबू धाबी पोलिसांनी स्पष्टपणे सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रस्त्यावर नमाज अदा करणे केवळ पूजा करणाऱ्यांसाठीच नाही तर पादचाऱ्यांसाठीही धोकादायक आहे.

दरम्यान, जनजागृती मोहिमेअंतर्गत जारी करण्यात आलेला पोलिसांचा (Police) हा आदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अबुधाबी पोलिसांच्या डीजीपीनुसार, आमचे उद्दिष्ट रस्ते सुरक्षा राखणे आहे. अनेकदा लोक रस्त्यावर आपली वाहने थांबवून नमाज अदा करु लागतात किंवा इतर काही कामे करतात. त्यामुळेच बस पार्किंग किंवा इतर धोके टाळता यावेत यासाठी हा आदेश जारी करण्यात आला आहे.

Road Side Namaz
Saudi Arabia Lift Ban On Jordan: पाकिस्ताननंतर जॉर्डनला सौदीचा आधार, मेंढ्या विकून होणार मालामाल!

दंड भरावा लागेल

रस्त्याच्या कडेला वाहन पार्क करणे अबुधाबीच्या वाहतूक कायदा क्रमांक 178 नुसार गुन्हा आहे, त्यासाठी दंड भरावा लागेल. वळणांवर किंवा चौकात वाहन थांबवल्यास 500 दिरहमचा दंड भरावा लागेल.

चुकीच्या पद्धतीने पार्किंग करताना किंवा चुकीच्या पद्धतीने वाहन थांबवल्यास 400 दिरहम भरावे लागतील. एवढेच नाही तर जे वाहन बिघाड झाल्यास आवश्यक सुरक्षेच्या उपाययोजना करणार नाहीत, त्यांना 500 दिरहमचा दंड भरावा लागणार आहे.

Road Side Namaz
Saudi Arabia: सूदानच्या गृहयुद्धात सौदी अरेबियाने भारतासाठी उचलले मोठे पाऊल

थांबू नका

तसेच, अबुधाबी (Abu Dhabi) वाहतूक विभागाचे उपसंचालक ले. कर्नल सलाह अब्दुल्ला अल हुमायरी यांनी वाहनचालकांना रस्त्याच्या कडेला वाहन थांबवू नये असे सांगितले आहे. ते म्हणाले की, लोकांनी रस्त्याच्या कडेला न करता विश्रांती कक्ष, गस्ती केंद्रे आणि कामगार शिबिरांमध्ये किंवा निवासी भागात बांधलेल्या मशिदींमध्ये नमाज अदा करावी.

या मोहिमेचा उद्देश बस चालकांना चुकीच्या किंवा अनोळखी ठिकाणी बस थांबवल्याने काय धोका आहे याची जाणीव करुन देणे हा आहे. हे वाहनचालकांसाठीच नव्हे तर रस्त्यावरील पादचाऱ्यांसाठीही धोकादायक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com