UK PM Race: पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक पाचव्या फेरीतही अव्वल

Rishi Sunak: ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक पाचव्या फेरीतही अव्वल ठरले.
Rishi Sunak
Rishi Sunak Dainik Gomantak
Published on
Updated on

UK PM Race: ब्रिटिश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाचे ऋषी सुनक पाचव्या फेरीतही अव्वल ठरले. त्यांना 137 मते मिळाली आहेत. मतदानाच्या पाचव्या फेरीसह, मंत्री पेनी मॉर्डाउंट पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून बाहेर पडले. त्यांना 105 मते मिळाली. आता सुनक यांचा सामना परराष्ट्र मंत्री लिझ ट्रसशी होणार आहे. त्यांना पाचव्या फेरीत 113 मते मिळाली आहेत.

दरम्यान, पाचही टप्प्यात ऋषी सुनक (Rishi Sunak) यांना सर्वाधिक मते मिळाली आहेत. चौथ्या फेरीच्या मतदानात त्यांना 118 मते मिळाली होती. सोमवारी झालेल्या तिसऱ्या फेरीच्या मतदानात त्यांना 115 मते मिळाली. त्याचवेळी दुसऱ्या फेरीत 101 तर पहिल्या फेरीत 88 मते मिळाली होती. सुनक सर्व टप्प्यांवर अव्वल राहिले आहेत.

Rishi Sunak
UK PM Race: ब्रिटीश पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक 118 मतांसह अव्वल

दुसरीकडे, लिझ ट्रस यांना चौथ्या फेरीत 86, तिसऱ्या फेरीत 71, दुसऱ्या फेरीत 64 आणि पहिल्या फेरीत 50 मते मिळाली. पेनी मॉर्डंट यांना चौथ्या फेरीत 92, तिसऱ्या फेरीत 82, दुसऱ्या फेरीत 83 आणि पहिल्या फेरीत 67 मते मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Pakistan Independence Day Chaos Viral Video
Shehbaz Sharif War Threat To India
Congo Ebola Epidemic Death Toll 2000
America Double Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com