Rishi Sunak यांच्या विजयासाठी ब्रिटनमध्ये होम हवन, जाणून घ्या

United Kingdom: ऋषी सुनक हे अनेक दिवसांपासून जगभरात चर्चेत आहेत.
Rishi Sunak
Rishi SunakDainik Gomantak

Rishi Sunak: ऋषी सुनक (Rishi Sunak) हे अनेक दिवसांपासून जगभरात चर्चेत आहेत. ब्रिटनच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ते कायम आहेत. ब्रिटिश मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनक यांचे प्रतिस्पर्धी परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस आतापर्यंतच्या टप्प्यात आघाडीवर आहेत. आतापर्यंत झालेल्या दोन ओपिनियन पोलमध्ये ट्रस यांनी सुनक यांच्यावर आघाडी घेतली आहे. असे असूनही ऋषी यांना पाठिंबा मिळतच आहे. त्यांच्या विजयासाठी ब्रिटनमध्ये भारतीय लोक हवन करत आहेत.

खरे तर, सुनक यांच्यासाठी हवन करणाऱ्या समर्थकांचे म्हणणे आहे की, 'ते एक सक्षम उमेदवार आहेत, म्हणून आम्ही त्यांच्या विजयासाठी होम हवन सुरु केला आहे.' इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, भारतीय डायस्पोरांनी त्यांच्या विजयासाठी हवनाचे आयोजन केले होते. एका ब्रिटीश भारतीय नागरिकाने सांगितले की, 'आम्ही त्यांच्या विजयासाठी प्रार्थना करत आहोत. कारण ते भारतीय आहेत म्हणून नाही, तर त्यांच्याकडे क्षमता आहे. ते देशाला संकटातून बाहेर काढू शकतात.'

Rishi Sunak
Rishi Sunak: 'मी पंतप्रधान झालो तर...'; ऋषी सुनक यांनी ड्रॅगनला भरला दम!

अलीकडेच, सुनक आणि ट्रस यांच्यात टेलिव्हिजनवर चर्चेची फेरी पाडली. यामध्ये कन्झर्व्हेटिव्ह पक्षाच्या सदस्यांमध्ये सुनक विजयी झाले. राहणीमानाचा वाढता खर्च, ऊर्जा बिले, महागाई यासारखे मुद्दे निवडणुकीच्या चर्चेच्या अजेंड्यावर आहेत. पूर्व पंतप्रधान बोरिस जॉन्सन (Boris Johnson) यांच्या राजीनाम्यानंतर सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्ष त्यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी निवडणूक (Election) मोहीम राबवत आहे.

दुसरीकडे, सप्टेंबरमध्ये पक्ष सदस्यांच्या अंतिम मतदानाद्वारे नवीन पंतप्रधानांची निवड केली जाईल. अनेक टप्प्यात निवडणूक प्रक्रिया सुरु आहे. सुनक यांच्या प्रतिस्पर्धी परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस या आतापर्यंतच्या टप्प्यात आघाडीवर आहेत. आतापर्यंत झालेल्या दोन ओपिनियन पोलमध्ये ट्रस यांनी सुनक यांच्यावर आघाडी घेतली आहे.

Rishi Sunak
UK PM Race: पंतप्रधानपदाच्या शर्यतीत ऋषी सुनक पाचव्या फेरीतही अव्वल

शिवाय, भारतीय डायस्पोरा यूकेमधील सर्वात मोठ्या वांशिक अल्पसंख्यांकांपैकी एक आहे. ब्रिटनमध्ये (Britain) सुमारे 1.5 दशलक्ष भारतीय राहतात. ते एकूण ब्रिटीश लोकसंख्येच्या 2.5 टक्के आहेत. यूकेच्या (UK) जीडीपीमध्ये त्यांचा सहा टक्के वाटा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com