Zombie Deer Disease: उत्तर अमेरिकेत पसरला असा रोग ज्यामुळे हरणांना चढत आहे नशा, पाहा Viral Video

Chronic Wasting Disease: या आजारात न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवतात. यामुळे हा रोग झालेली हरणे नशेच्या अवस्थेत दिसत असून, ती आळशी होऊन रिकाम्या जागेकडे एकटक पाहत आहेत.
Zombie Deer Disease, Chronic Wasting Disease
Zombie Deer Disease, Chronic Wasting Disease
Published on
Updated on

Researchers in America warned about the spread of chronic wasting disease or 'zombie deer disease', which causes the animals to become unconscious and delirious:

उत्तर अमेरिकेत एका नवीन रोगाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. आणि हा रोग खूप वेगाने पसरत आहे. याचे नाव क्रॉनिक वेस्टिंग डिसीज (CWD) आहे, परंतु लोक याला झोम्बी डीअर डिसीज असेही म्हणतात. झोम्बी डियर डिसीज हरणांमध्ये अतिशय शांतपणे पसरत आहे.

हरणांमध्ये पसरलेल्या या धोकादायक आजारामुळे शास्त्रज्ञांना काळजी वाटू लागली आहे की, हा झोम्बी डियर रोग मानवांमध्येही पसरू शकतो.

या आजारात न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवतात. यामुळे हा रोग झालेली हरणे नशेच्या अवस्थेत दिसत असून, ती आळशी होऊन रिकाम्या जागेकडे एकटक पाहत आहेत.

आत्तापर्यंत हा आजार एकट्या वायोमिंगमध्ये 800 हून अधिक हरणांमध्ये आढळला आहे.

Zombie Deer Disease, Chronic Wasting Disease
मोठा खुलासा! पत्नीनेच केली राष्ट्राध्यक्ष पतीची हत्या; पंतप्रधानाच्या साथीने रचला होता कट

शास्त्रज्ञांच्या मते, या रोगामुळे न्यूरोलॉजिकल डिजेनेरेशन होते. म्हणजे मेंदूचा विकास थांबतो. मन निस्तेज होऊ लागते. गोष्टी समजून घेण्याची क्षमता नाहीशी होऊ लागते.

या आजारामुळे होणाऱ्या रोगांची समस्या अशी आहे की, ते वातावरणात शतकानुशतके टिकून राहू शकतात. संधी पाहून ते पुन्हा पसरू लागतात.

Zombie Deer Disease, Chronic Wasting Disease
Vladimir Putin बुडाले 32 वर्षांनी लहान महिलेच्या प्रेमात? ब्रिटीश वृत्तपत्राचा दावा

या रोगांची आणखी एक समस्या अशी आहे की, फॉर्मल्डिहाइड, रेडिएशन किंवा अत्यंत उच्च किंवा कमी तापमान देखील त्यांना दूर करू शकत नाही.

CWD च्या प्रसाराचा सर्वात मोठा धोका मानव आणि पर्यावरण दोघांनाही आहे. हा रोग थेट मानवांना संक्रमित करू शकतो की नाही याचा कोणताही थेट पुरावा सध्या उपलब्ध नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com