Mehul Choksi: पीएनबी घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सीविरोधातील रेड कॉर्नर नोटीस रद्द; CBI चे मौन

2018 मध्ये देशातून पळाला होता चोक्सी
 Mehul Choksi
Mehul ChoksiDainik Gomantak

Mehul Choksi: पंजाब नॅशनल बँकेतील 14 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचे नाव रेड नोटिसमधून हटवण्यात आले आहे. मेहुलने रेड कॉर्नर नोटीस विरुद्ध इंटरपोलच्या लियॉन मुख्यालयात अपील केल्याचे सांगितले जाते. या प्रकरणावर सध्यातरी सीबीआयने काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 Mehul Choksi
Viral Video: जपानच्या पंतप्रधानांनी चाखली लस्सी आणि पाणीपुरी; दिल्लीतील बागेत फेरफटका

चोक्सी 2018 मध्ये देशातून पळून गेला होता. 10 महिन्यांनंतर त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. तोपर्यंत तो अँटिग्वा आणि बारबुडामध्ये लपून बसला होता. पुढे त्याने तेथील नागरिकत्व मिळवले.

चोक्सीने सीबीआयच्या अर्जाला उत्तर देताना असा युक्तिवाद केला होता की भारतातील तुरुंगांची स्थिती अत्यंत वाईट आहे. तिथे त्याला धोका असू शकतो. याशिवाय त्यांनी आरोग्याशी संबंधित युक्तिवादही केला होता. इंटरपोलच्या पाच सदस्यीय समितीने यावर सुनावणी केली होती.

त्याला कमिशन फॉर कंट्रोल फाइल्स म्हणतात. या न्यायालयाला किंवा कायदेशीर समितीला कोणत्याही व्यक्ती किंवा आरोपीविरुद्धची रेड नोटीस रद्द करण्याचा अधिकार आहे.

195 देश इंटरपोलचे सदस्य आहेत. रेड कॉर्नर नोटीस जारी केल्यावर, संबंधित व्यक्तीला तात्पुरते ताब्यात घेतले जाऊ शकते. तसेच केवळ तात्पुरती अटक केली जाऊ शकते. यानंतर त्याला अटक करण्यात आलेल्या देशाच्या कायद्यानुसार कारवाई केली जाते. बर्‍याच प्रकरणांमध्ये, तो ज्या देशात हवा आहे त्या देशाच्या हवाली (प्रत्यार्पण) केले जाते.

 Mehul Choksi
Indian Flag: 'राष्ट्रध्वजाचा अपमान खपवून घेणार नाही', दिल्लीत शिख समुदयाचा संताप

चोक्सीशिवाय नीरव मोदीचेही नाव सीबीआयच्या आरोपपत्रात आहे. चोक्सी मे 2021 मध्ये अँटिग्वामधून गायब झाला आणि शेजारच्या डॉमिनिकाला पोहोचला. येथे त्याला अटक करण्यात आली.

मेहुल चोक्सीला भारतात परत आणण्यासाठी बँकिंग घोटाळ्याप्रकरणी सीबीआय अधिकारी शारदा राऊत यांच्या नेतृत्वाखाली 8 सदस्यीय पथक डॉमिनिकाला पोहोचले होते. परंतु त्याआधीच त्याला ब्रिटिश राणीच्या प्रिव्ही कौन्सिलकडून दिलासा मिळाला.

नंतर त्याला पुन्हा अँटिग्वाच्या ताब्यात देण्यात आले. मात्र, 62 वर्षीय चोक्सीला डॉमिनिका तुरुंगात 51 दिवस काढावे लागले. येथे त्याने युक्तिवाद केला की त्याला अँटिग्वाला जाऊन तेथील न्यूरोलॉजिस्टकडून उपचार घ्यायचे आहेत. अँटिग्वाला पोहोचल्यानंतर काही दिवसांनी डोमिनिकाच्या कोर्टाने चोक्सीवर दाखल केलेले खटलेही फेटाळून लावले.

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्यावर पंजाब नॅशनल बँकेच्या ब्रॅडी हाऊस शाखेच्या अधिका-यांच्या संगनमताने 14 हजार कोटींहून अधिकचा घोटाळा केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com