Delhi News: खलिस्तान समर्थक फुटीरतावाद्यांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात तिरंग्या ध्वजाचा अपमान केला, ज्याच्या निषेधार्थ शीख समुदायाच्या लोकांनी सोमवारी दिल्लीत निषेध नोंदवला.
दिल्लीतील चाणक्यपुरी येथील ब्रिटिश उच्चायुक्तालयाबाहेर शीख समुदायाचे लोक मोठ्या संख्येने जमले. हातात तिरंगा ध्वज आणि घोषणांचे फलक घेऊन ते निषेध करत होते. ‘भारत आमचा स्वाभीमान आहे’, ‘राष्ट्रध्वजाचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही’ असे फलकांवर लिहिले होते.
रविवारी कट्टरपंथी खलिस्तान समर्थकांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयातून तिरंगा हटवण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर भारत (India) सरकारने ब्रिटीश राजनैतिक अधिकाऱ्यांना दिल्लीत बोलावले.
यासोबतच लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाची खिडकी तोडल्याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
कट्टरवाद्यांचा हल्ला आम्ही हाणून पाडला असून तिरंगा अभिमानाने फडकत असल्याचे भारतीय उच्चायुक्तांनी सांगितले. यादरम्यान सुरक्षा कर्मचाऱ्यांचे दोन सदस्यही जखमी झाले.
शीख समुदायाचा रोष पाहता दिल्लीतील (Delhi) ब्रिटिश उच्चायुक्तालयाबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोमवारी शिख समुदायाचे लोक मोठ्या संख्येने उच्चायुक्तालयासमोर निदर्शने करण्यासाठी आले होते, लंडनमधील घटनेवर लोकांनी संताप व्यक्त केला.
तिथे उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नानंतर आंदोलकांना हटवले. यानंतर उच्चायुक्तालयाभोवती आणखी सुरक्षा वाढवण्यात आली. निदर्शनादरम्यान शीख समुदायाचे लोक ब्रिटिश उच्चायुक्तालयाच्या मुख्य गेटवर पोहोचले होते.
भाजप नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी आंतरराष्ट्रीय शीख समुदायाला भारतविरोधी कारवाया आणि खलिस्तानी तत्वांना विरोध करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी खलिस्तानींना संदेश देत शीख समुदायाचे भारतावर प्रेम असल्याचे सांगितले.
तसेच ब्रिटनलाही संदेश दिला की, भारतीय ध्वजाचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान अजिबात सहन केला जाणार नाही.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.