Rahul in USA : अमेरिकेत, राहुल गांधींच्या कार्यक्रमात घुसले खलीस्तानी; राहुल-मोदींना धमकी

Rahul Gandhi In America : राहुल गांधी सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करत असताना काही खलिस्तानी समर्थक उभे राहिले आणि घोषणाबाजी करू लागले. त्यांनी हवेत खलिस्तानी झेंडेही फडकवले.
Rahul Gandhi Speaking in USA.
Rahul Gandhi Speaking in USA.Dainik Gomantak.
Published on
Updated on

Rahul Gandhis USA Tour

काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या अमेरिकाच्या दौऱ्यावर असून कालपासून त्यांचे अनेक कार्यक्रम सुरू आहेत. अशात बुधवारी राहुल यांना खलिस्तानी समर्थकांचा सामना करावा लागला. बुधवारी ते सॅन फ्रान्सिस्कोमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करत असताना सभागृहात बसलेल्या खलिस्तानी समर्थकांनी घोषणाबाजी सुरू केली. त्यांनी हवेत खलिस्तानी झेंडे फडकावले आणि 'खलिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा दिल्या.

याला उत्तर देताना राहुल गांधी हसले आणि म्हणाले, 'द्वेषाच्या शहरात प्रेमाचे दुकान'. दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याने राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींना धमकी देणारा व्हिडिओ जारी केला आहे.

या घटनेनंतर सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये 'सिख फॉर जस्टिस'चा नेता गुरपतवंत सिंह पन्नू राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना धमकावताना दिसत आहेत. अमेरिकेत राहणारा मोस्ट वाँटेड दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू व्हिडिओमध्ये म्हणतो की, राहुल गांधी अमेरिकेत जिथे जातील तिथे त्यांच्यासमोर खलिस्तानी उभे राहतील. ते म्हणतात की 22 जूनला पुढची पाळी पीएम मोदींची आहे.

यापूर्वी 2018 मध्ये, तिघांचा एका गटाने तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या लंडनमधील कार्यक्रमात प्रवेश करण्यात यशस्वी झाला आणि “खलिस्तान झिंदाबाद” अशा घोषणा दिल्या.

राहुल वॉशिंग्टनमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित करतील आणि कायदेतज्ज्ञ आणि संस्थांशी संबंधित लोकांच्या भेटीगाठी घेतील. 4 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमाने ते त्यांचा दौरा संपवणार आहेत. हा संवाद न्यूयॉर्कमधील जाविट्स सेंटरमध्ये होणार आहे.

Rahul Gandhi Speaking in USA.
Delhi Murder Case: गुंतागुत वाढली; दिल्ली हत्या प्रकरणात आता Ex Boyfriend ची एन्ट्री

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय प्रवासींच्या मेळाव्याला संबोधित करताना, भारतातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर लोकांना 'धमकावणे' आणि देशाच्या एजन्सीचा 'दुरुपयोग' केल्याचा आरोप केला. मंगळवारी कॅलिफोर्नियातील सांता क्लारा येथे एका कार्यक्रमात गांधी म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) भारतातील राजकारणाच्या सर्व माध्यमांवर नियंत्रण ठेवत आहेत. ते म्हणाले की, त्यांची 'भारत जोडो यात्रा' सुरू करण्यापूर्वी, राजकारणातील जुनी शैली आता चालत नाही, याची जाणीव झाली.

Rahul Gandhi Speaking in USA.
Rahul Gandhi in USA : “राहुल गांधी परदेशात भारताचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत”

राहुल गांधी 30 मे रोजी तीन शहरांच्या दौऱ्यासाठी अमेरिकेत पोहोचले. त्यांनी सॅन फ्रान्सिस्को येथून त्यांच्या दौऱ्याची सुरुवात केल्याने पुढील दोन शहरे वॉशिंग्टन डीसी आणि न्यूयॉर्क असतील. 4 जून रोजी न्यूयॉर्कमध्ये सार्वजनिक मेळाव्याने ते त्यांच्या दौऱ्याचा समारोप करणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com