कतारमध्ये 8 माजी नौसैनिक मृत्युदंडाच्या शिक्षेपासून कसे वाचले? जाणून घ्या भारताच्या मुत्सद्दीगिरीची Inside Story

Dahra Global Case in Qatar Latest Updates: कतारने या सर्व 8 भारतीयांची फाशीची शिक्षा कमी केली, त्यानंतर आता त्यांच्या सुरक्षित भारतात परतण्याची आशा वाढली.
Prime Minister Modi and Emir of Qatar
Prime Minister Modi and Emir of QatarDainik Gomantak
Published on
Updated on

Dahra Global Case in Qatar Latest Updates: कतारमध्ये अडचणीत अडकलेल्या 8 भारतीयांना दिलासा मिळाल्याची बातमी गुरुवारी आली आणि सगळीकडे मोदी सरकारच्या मुत्सद्दीगिरीची चर्चा सुरु झाली. कतारने या सर्व 8 भारतीयांची फाशीची शिक्षा कमी केली, त्यानंतर आता त्यांच्या सुरक्षित भारतात परतण्याची आशा वाढली. नुपूर शर्मा यांसारख्या प्रकरणांवरुन निदर्शने आणि नंतर माजी नौसैनिकांना फाशीची शिक्षा, या दोन प्रकरणांनंतर कतार-भारत संबंधात तणाव निर्माण होण्याचा धोका वाढला होता, परंतु आता ज्या पद्धतीने माजी नौसैनिकांना देण्यात आलेली फाशीची शिक्षा कमी झाली, यावरुन अंदाज लावता येईल की, दोन्ही देशातील तवाण कमी झाला असावा. विशेष म्हणजे, याकडे भारताचे राजनैतिक यश म्हणून पाहिले जात आहे. चला तर मग या मुत्सद्दी कामगिरीच्या Inside Story एक नजर टाकूया...

जेव्हा पंतप्रधान मोदी पहिल्यांदा कतारला गेले होते

आधी थोडं मागे इतिहासात डोकावून पाहूया... 4 जून 2016 ही तारीख पंतप्रधान मोदींची कतारला पहिली भेट होती. अनिवासी भारतीयांमधील कतारच्या अमिराबद्दल ते काय म्हणाले हे आज सर्वांनी जाणून घेतले पाहिजे. तेव्हा पीएम मोदी म्हणाले होते की, ''इथल्या राज्यकर्त्यांचेही भारतीय समुदायावर खूप प्रेम आहे. त्याच्यावर प्रचंड विश्वास आहे. माझा विश्वास आहे की, जेव्हा आपण त्यांच्यासमोर काही ठेवतो तेव्हा ते त्यावर उपाय शोधतात. मी आतापर्यंत जे काही बोललो, त्याचे सकारात्मक परिणाम मला दिसले आहेत.''

Prime Minister Modi and Emir of Qatar
Qatar Navy Veterans Case: 8 भारतीयांच्या फाशीच्या शिक्षेमागे पाकिस्तानचा हात? पाक-कतारी अधिकाऱ्यांच्या भेटी...

अलीकडेच पंतप्रधान मोदींनी कतारच्या अमीरांची भेट घेतली

दरम्यान, 2016 मध्ये पंतप्रधान मोदींनी कतारच्या अमीराबद्दल सांगितले होते की, ते उपाय शोधतात. तर 8 भारतीयांना फाशी देण्याच्या प्रकरणात कतारच्या अमीराने असेच केले होते का? कतारने 8 भारतीयांची फाशीची शिक्षा कमी केली. 2 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांची दुबईमध्ये भेट झाली होती. दोन्ही नेते ज्या प्रकारे हसतमुखाने भेटले, त्यावरुन असे वाटत होते की, कतारमध्ये तुरुंगात असलेल्या 8 भारतीयांच्या कुटुंबीयांना लवकरच अशीच हसण्याची संधी मिळणार का? पंतप्रधान मोदी आणि कतारचे शेख यांच्यातील केमिस्ट्री खूप महत्त्वाची आहे, ज्यामुळे लवकरच 8 भारतीयांना फाशीच्या शिक्षेतून मोठा दिलासा मिळू शकतो.

COP28 शिखर परिषदेत बैठक झाली

पंतप्रधान मोदींनी 8 भारतीयांशी संबंधित समस्या कतारच्या राज्यकर्त्यांसमोर मांडली आणि त्यानंतरच कतारचा सूर बदलला का? कारण या बैठकीत तुरुंगात असलेल्या 8 भारतीयांबाबत कतार आणि भारत या दोन्ही देशांनी काहीही सांगितले नाही. दुबईतील COP28 शिखर परिषदेत कतारचे शासक शेख तमीम बिन हमदाद अल थानी यांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले. भेटण्याची संधी मिळाली. द्विपक्षीय भागीदारीच्या शक्यता आणि कतारमधील भारतीय समुदायाच्या कल्याणाबाबत आमच्यात चांगली चर्चा झाली."

Prime Minister Modi and Emir of Qatar
Qatar: हेरगिरी प्रकरणात भारतीय नौदलाच्या 8 अधिकाऱ्यांना होणार फाशीची शिक्षा? PAK मीडियाचा खळबळजनक दावा

कतारचे शेख आणि पीएम मोदी यांची भेटी

एक विशेष बाब म्हणजे कतारचे शेख हे नेहमीच पंतप्रधान मोदींना मोकळ्यापणाने भेटताना दिसले आहेत. 8 वर्षांपूर्वीची त्यांची पहिली भेट असो की मग 25 मार्च 2015 रोजी भारतात आलेले कतारचे अमीर प्रत्येक फोटोत हसतमुखाने दिसले आणि त्यांनी पंतप्रधान मोदींची हसतमुखाने भेट घेतली. इतकेच नाही तर पुढच्या वर्षी पंतप्रधान मोदी कतारला गेले तेव्हा दोन्ही नेत्यांमध्ये अशीच जवळीकता दिसून आली होती. संयुक्त राष्ट्र महासभेच्या बैठकीदरम्यानही दोन्ही नेतेही एकदम हसतमुखाने एकमेकांना भेटले होते. अशा परिस्थितीत पुढे असे काय घडले की, कतारने 30 ऑगस्ट 2022 च्या रात्री आठ माजी भारतीय नौसैनिकांना ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, या सर्वांना इतर कैद्यांपासून वेगळे ठेवण्यात आले. या भारतीयांमध्ये तीन निवृत्त कॅप्टन, चार कमांडर आणि एका नावीकाचाही समावेश आहे.

2 डिसेंबर रोजी या विषयावर काही चर्चा झाली होती का?

दुसरीकडे, 2 डिसेंबर रोजी दुबईत पंतप्रधान मोदी आणि कतारचे अमीर यांच्यात काही बातचित झाली होती का, हा प्रश्न आहे. मात्र, या प्रश्नाचे उत्तर कोणाकडे नाही, पण या भेटीनंतर काही बदल झाले ते पाहूया... 2 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी आणि कतारचे अमीर दुबईत भेटले. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी कतारने भारतीय राजदूताला तुरुंगात असलेल्या 8 भारतीयांना भेटण्याची परवानगी दिली आणि 26 दिवसांनंतर सर्व 8 भारतीयांची फाशीची शिक्षा कमी करण्यात आली. कतारबरोबर त्यांच्याबाबतीत पडद्यामागून काही प्रयत्न केले जात होते का, हा प्रश्न आहे आणि म्हणूनच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी 30 ऑक्टोबर रोजी आश्वस्त केले होते की, ही बाब सरकारच्या प्राधान्यक्रमांपैकी एक आहे.

Prime Minister Modi and Emir of Qatar
Israel-Hamas War: ''हिंसा हा कोणत्याही हिंसेवर...'' इस्रायली तरुणांची सैन्यात भरती होण्यास नापसंती; इस्रायल करतयं जबरदस्ती

भारतासाठी आव्हान काय होते?

सौदी अरेबिया-यूएई सारख्या भारताच्या जवळच्या मित्रांचे संबंध कतारशी चांगले नसल्यामुळे कतारला आपला मुद्दा पटवून देणं हे भारतासमोर मोठं आव्हान होतं. दोन्ही देशांनी 2017 ते 2021 या काळात कतारसोबतचे संबंध पूर्णपणे तोडले आहेत. या प्रकरणी अमेरिकेकडून मदत मिळणेही अवघड आहे, कारण 8 भारतीयांवरील आरोप कतारच्या राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहेत. त्यामुळे मोदी आणि कतारचे अमीर यांच्यातील केमिस्ट्री हाच सर्वात विश्वासार्ह पर्याय आहे.

त्यामुळे कुठेतरी कतारच्या राज्यकर्त्याच्या मनात भारताबाबत चांगली प्रतिमा आहे. पण तरीही नुपूर शर्मासारख्या प्रकरणाचा निषेध करणारा हा मध्यपूर्वेतील पहिला देश होता आणि त्याने 8 भारतीयांना अटक करुन भारताला चकित केले. त्यामुळेच कतारच्या बाजूने ताजी उदारता हा भारताचा मोठा राजनैतिक विजय मानला जाऊ शकतो. माजी नौसैनिकांना दिलासा देणे ही एक मोठी राजनैतिक उपलब्धी म्हणून पाहिले जात आहे.

Prime Minister Modi and Emir of Qatar
Israel-Hamas War: जहाजांवर हल्ले, अमेरिकेच्या ठिकाणांना केलं टार्गेट; नवीन वर्षही युद्धाच्या सावटाखाली?

भारतीयांचे परतणे शक्य आहे का?

कतारमध्ये कैदेत असलेल्या सर्व भारतीयांची मृत्यूच्या तावडीतून सुटका झाली असावी. पण त्यांचे परत येणे शक्य आहे का? या प्रश्नाचे उत्तर सकारात्मक आहे. 2 डिसेंबर 2014 रोजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने भारत आणि कतार यांच्यातील शिक्षा झालेल्या व्यक्तींच्या हस्तांतरणाच्या कराराला मंजुरी दिली. त्यानंतर मार्च 2015 मध्ये दोन्ही देशांदरम्यान करार झाला होता. या करारानंतर कतारमध्ये शिक्षा झालेल्या भारतीय कैद्यांना त्यांची उर्वरित शिक्षा भारतात पूर्ण करता येईल आणि कतारचा नागरिक भारतात शिक्षा भोगत असेल, तर तो त्या शिक्षेचा कालावधी आपल्या देशात पूर्ण करु शकतो. जरी कतारने मध्यरात्री 8 भारतीयांना पकडून तुरुंगात टाकले. मात्र त्यानंतरही ज्या पद्धतीने दोघांमध्ये राजनैतिक चर्चा सुरु राहिली, त्यामुळे कतारमधून 8 भारतीय परतण्याची आशा प्रबळ झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com