Qatar Navy Veterans Case: 8 भारतीयांच्या फाशीच्या शिक्षेमागे पाकिस्तानचा हात? पाक-कतारी अधिकाऱ्यांच्या भेटी...

Qatar Indian Navy Veterans Case: कतारमध्ये 8 भारतीयांना सुनावण्यात आलेल्या फाशीशी पाकिस्तानचे कनेक्शन समोर आले आहे.
Qatar Indian Navy Veterans Case
Qatar Indian Navy Veterans CaseDainik Gomantak

Qatar Indian Navy Veterans Case: कतारमध्ये 8 भारतीयांना सुनावण्यात आलेल्या फाशीशी पाकिस्तानचे कनेक्शन समोर आले आहे. भारतीयांना शिक्षा सुनावल्यानंतर पाकिस्तान आणि कतारच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाल्याचे कळते आहे.

विशेष म्हणजे, कतार सरकारने भारतीयांवरील आरोप अद्याप सार्वजनिक केलेले नाहीत. दुसरीकडे, या संपूर्ण प्रकरणावर संशयही वाढत आहे, कारण अल देहरा कंपनीचा मालक असलेल्या ओमानी नागरिकाची कतारने सुटका केली आहे. तर 8 भारतीयांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

भारतीयांविरुद्ध षड्यंत्रांची स्क्रिप्ट

दरम्यान, 12 ऑक्टोबरला पाकिस्तानचे (Pakistan) लष्करप्रमुख असीम मुनीर आणि कतारचे लष्करप्रमुख रावळपिंडीत भेटल्याचे दिसत आहे. मिळालेल्या विशेष माहितीनुसार, कतारमध्ये उपस्थित असलेल्या भारतीयांविरुद्धच्या कटाची स्क्रिप्ट या बैठकीत लिहिली गेली.

Qatar Indian Navy Veterans Case
57 मुस्लिम देशांचे संघटन OIC ने भारताविरोधात पुन्हा ओकली गरळ, वक्तव्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय

पाकिस्तान आणि कतारच्या लष्करी अधिकाऱ्यांची बैठक

कतार हवाई दलाचे कमांडर मेजर जनरल जसीम मोहम्मद आणि पाकिस्तानचे तात्काळ नौदल प्रमुख अॅडमिरल मोहम्मद अमजद नियाझी यांनी बैठकीत भाग घेतला होता. 7 जून 2022 रोजी दोघेही पाकिस्तानातील इस्लामाबाद येथील नौदल मुख्यालयात भेटले होते.

दोन महिन्यांनंतर म्हणजेच 30 ऑगस्ट रोजी कतारमध्ये भारतीय खलाशांना अटक करण्यात आली होती. पाकिस्तान आणि आयएसआयच्या (ISI) सांगण्यावरुनच भारतीय नौसैनिकांवर खोटे आरोप करण्यात आल्याचे मानले जाते.

कतार प्रकरणात आयएसआयच्या कटाचा पुरावा

कतार आणि पाकिस्तानचे लष्करी अधिकारी सातत्याने भेटत आहेत. या वर्षी मार्च महिन्यात त्यांची भेट झाली होती. या भेटीत कतारचे संरक्षण मंत्री अल-अतियाहही सहभागी झाले होते. या बैठकीनंतरच कतारने भारतीय नौसैनिकांवर न्यायालयीन सुनावणी सुरु केली आणि फाशीची शिक्षा देण्यात आली.

म्हणजेच कतारने भारतीय नौदल जवानांच्या बाबतीत जे काही पाऊल उचलले त्याच्या काही दिवस आधी पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयशी संबंधित लोकांनी कतारच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती.

Qatar Indian Navy Veterans Case
Iran-USA: 'जर इस्राइलला पाठिंबा देणं थांबवलं नाही तर...' संतप्त इराणचा अमेरिकेला इशारा

दुसरीकडे, अद्याप कतारने आरोप सार्वजनिक का केले नाहीत? हा प्रश्नच आहे. कतारने बंद दाराआड सुनावणी का घेतली? कंपनी मालकाला तथाकथित हेरगिरीत का सोडले गेले? आरोप समोर येताच कंपनी का बंद करण्यात आली? आरोपींना कुटुंबीयांना का भेटू दिले नाही?

दरम्यान, हे लक्षात घेण्यासारखे आहे की, 12 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानमध्ये कट रचला गेला होता का? पाकिस्तान आणि कतारच्या लष्करप्रमुखांच्या बैठकीचा अजेंडा काय होता?

कतारचे लष्करप्रमुख पाक लष्कराच्या मुख्यालयात का गेले? शिक्षेची घोषणा होण्यापूर्वी पाकिस्तानी अधिकारी का भेटले आणि कतार हवाई दल आणि पाकिस्तान नौदलाचे अधिकारी जूनमध्ये का भेटले? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप अनुत्तरीतच आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com