UK Royal Family: वडील राजे चार्ल्स तिसरे यांच्यासोबतच्या नात्याबाबत प्रिन्स हॅरी यांचा वृत्तपत्रांवर हल्लाबोल, म्हणाले...

UK Royal Family: प्रिन्स हॅरीने अलीकडेच किंग चार्ल्स तिसरे हे त्यांचे खरे वडील नसल्याच्या दीर्घकाळ चाललेल्या अफवांवर मौन सोडले आहे.
Prince Harry
Prince Harry Dainik Gomantak
Published on
Updated on

UK Royal Family: प्रिन्स हॅरीने अलीकडेच किंग चार्ल्स तिसरे हे त्यांचे खरे वडील नसल्याच्या दीर्घकाळ चाललेल्या अफवांवर मौन सोडले आहे. या दाव्यामुळे त्यांना वर्षानुवर्षे खूप वेदना होत असल्याचे त्यांनी सांगितले.

6 जून रोजी न्यायालयीन साक्ष देताना, ड्यूक ऑफ ससेक्सने सांगितले की, ब्रिटीश वृत्तपत्राच्या पत्रकारांना त्यांचे वडील मेजर जेम्स हेविट असल्याचे सिद्ध करायचे होते. त्यांना माझी राजघराण्यातून 'हकालपट्टी' करायची होती.

दरम्यान, ड्यूक ऑफ ससेक्सने विशेषतः मिरर ग्रुप वृत्तपत्रांवर खटला भरला आहे. त्यांचा आरोप आहे की, या ग्रुपने त्यांच्यावरील डझनभर बातम्यांचे लेख तयार करण्यासाठी माहिती गोळा करण्यासाठी फोन हॅकिंगसारख्या अनैतिक पद्धतींचा कथितपणे वापर केला. यापैकी एक 2002 मध्ये द पीपलमध्ये प्रकाशित झालेला लेख होता: 'हॅरीचा डीएनए चोरण्याचा कट'.

Prince Harry
Prince Harrys Book: 'मी 25 तालिबान्यांना मारलं होतं...', प्रिन्स हॅरी यांच्या खुलाशाने जगभरात खळबळ

'वृत्तपत्रांनी अफवा काढल्या'

प्रिन्स हॅरी म्हणाले की, 'माझ्या आईने त्यांच्याशी प्रेमसंबंध असल्याचे कबूल केल्यानंतर अनेक वृत्तपत्रांनी माझे जैविक वडील जेम्स हेविट असल्याची अफवा पसरवली होती.'

साक्षीदाराच्या निवेदनात, प्रिन्स हॅरीने अफवांच्या खोट्या स्वरुपाचा पुनरुच्चार केला. जेम्स हेविटशी त्यांच्या आईचे प्रेमसंबंध त्यांच्या जन्माच्या काही वर्षांनंतर सुरु झाले नाहीत, या वस्तुस्थितीचाही त्यांनी उल्लेख केला. त्यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे की, 'माझा जन्म होईपर्यंत माझी आई मेजर हेविटला भेटली नाही.'

Prince Harry
प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कलसोबत संबंध ठेवण्याची ‘या’ मॉडेलने व्यक्त केली इच्छा!

'मी नेहमी अफवांमागील हेतूवर प्रश्न उपस्थित केले'

प्रिन्स हॅरीच्या म्हणण्यानुसार, 'जेव्हा मी 18 वर्षांचा होतो आणि सहा वर्षांपूर्वी आईला [प्रिन्सेस डायना] गमावले, तेव्हा मला अशा अफवांनी मला खूप त्रास दिला.

ते पुढे म्हणाले की, 'मी नेहमी या अफवांमागील हेतूवर प्रश्न उपस्थित करत असतो. माझी राजघराण्यातून हकालपट्टी व्हावी म्हणून वृत्तपत्रांना (Newspaper) जनतेच्या मनात शंका निर्माण करायची होती का?'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com