Ukraine war: "नरसंहार", रशियन हल्ल्याचा कॅनडा खासदारांनी केला निषेध

रशिया आणि युक्रेन (Ukraine) यांच्यात मागील दीड ते दोन महिन्यांपासून युध्द सुरु आहे.
Justin Trudeau
Justin TrudeauDainik Gomantak
Published on
Updated on

रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील दीड ते दोन महिन्यांपासून युध्द सुरु आहे. या युद्धात युक्रेनमधील अनेक शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली आहे. दुसरीकडे, अमेरिकेसह इतर पाश्चात्य देशांनी रशियावर अनेक निर्बंध जाहीर केले आहेत. युक्रेनमध्ये रशियन लष्कराच्या कारवायांवर कॅनडानेही (Canada) टीका केली आहे.

Justin Trudeau
Russia Ukraine War: रशियाचे युक्रेनवर सायबर हल्ले

दरम्यान, रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, युक्रेनमधील रशियाच्या हल्ल्यांचा उल्लेख "नरसंहार" म्हणून करण्यासाठी कॅनडाच्या (Canada) खासदारांनी बुधवारी एकमताने मतदान केले. संसदेच्या सदस्यांनी सांगितले की, मॉस्कोने केलेल्या "मानवतेविरुद्ध मोठ्या प्रमाणात युद्ध गुन्ह्यांचे ठोस पुरावे" आहेत.

कॅनेडियन हाऊस ऑफ कॉमन्सच्या ठरावात असं म्हटलं आहे की, ''रशियाद्वारे युद्ध गुन्ह्यांमध्ये सामूहिक अत्याचारांची अनेक उदाहरणे आहेत. युक्रेनियन नागरिकांची जाणीवपूर्वक हत्या करण्यात आली. त्याचबरोबर प्रेतांशी गैरवर्तन, युक्रेनियन मुलांचे जबरदस्तीने हस्तांतरण, छळ, शारीरिक हानी, मानसिक हानी आणि बलात्कार यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश आहे.''

Justin Trudeau
Russia-Ukraine War: 'रशियाला मदत केल्यास...,' अमेरिकेने दिली चीनला धमकी

तसेच, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांनी नुकतेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत केलेल्या भाषणात रशियावर निशाणा साधला होता. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, 'रशियाची (Russia) वृत्ती दहशतवाद्यांपेक्षा वेगळी नाही.' ते पुढे म्हणाले की, ''जगाला अद्याप युक्रेनचे संपूर्ण सत्य माहित नाही. बुका शहर रशियन सैन्याच्या ताब्यातून मुक्त झाल्यानंतर तिथे सामूहिक कबरी सापडल्या आहेत. लोकांचे मृतदेह सापडले आहेत.''

याशिवाय, संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस बुधवारी राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा करण्यासाठी युक्रेनमध्ये दाखल झाले. यापूर्वी मॉस्कोमध्ये, त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची भेट घेतली, ज्यांनी मारियुपोल येथील अजोव्स्टल प्लांटमधून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाला सामील करुन घेण्यास तत्वतः मान्यता दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com