जगातील सर्वात 'आनंदी' देशात PM मोदी; डेन्मार्कशी संबंधित या गोष्टी वाचून व्हाल थक्क

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) तीन युरोपीय देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी बर्लिनहून डेन्मार्कला पोहोचले.
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन युरोपीय देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी बर्लिनहून डेन्मार्कला पोहोचले. इथे त्यांनी पंतप्रधान मॅट फ्रेडरिकसन यांच्याशी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यासोबतच डेन्मार्कची राणी मार्ग्रेट द्वितीय यांनीही पंतप्रधान मोदींचे (Prime Minister Narendra Modi) जोरदार स्वागत केले. डेन्मार्क हा असा देश आहे, जो जगातील इतर देशांच्या तुलनेत जवळजवळ सर्वच बाबतीत वेगळा आहे. जाणून घेऊया त्याबद्दलच्या काही महत्त्वाच्या गोष्टी... (Prime Minister Narendra Modi visited Denmark one of the happiest countries in the world)

लोकांपेक्षा सायकलची संख्या जास्त - डेन्मार्क (Denmark) हा जगातील सर्वात आनंदी देश आहे. राजधानी कोपनहेगनमध्ये लोकांपेक्षा जास्त सायकली आहेत. राजधानीची लोकसंख्या सहा लाख आहे, तर येथील सायकलची संख्या 6.75 लाख आहे. हे जगातील एकमेव शहर आहे, जिथे लोकांपेक्षा जास्त सायकली आहेत. सायकल वापराची तीन मोठी कारणे आहेत. पहिले कारण, इथे नवीन कार खरेदी करताना सरकार 150 टक्के कर आकारते. दुसरे, देशातील सायकल ट्रॅकची लांबी 12,000 किमी पेक्षा जास्त आहे, आणि सरकार स्वतः त्यांना चालवण्यास प्रोत्साहित करते. तिसरे, हे शहर भौगोलिक दृष्टिकोनातून सायकलिंगसाठी उत्तम आहे. इथे डोंगर किंवा चढ-उतार नाहीत. त्यामुळे प्रदूषणही कमी होते आणि लोकांचे आरोग्यही चांगले राहते.

Prime Minister Narendra Modi
युरोपियन युनियनने रशियासाठी आखली तेल बंदीची योजना

नोकरी न मिळाल्याचा पगार- डेन्मार्कमध्ये लोक बेरोजगारीमुळे (Unemployment) निराश होऊ नयेत, यासाठी सरकार त्यांना बेरोजगारी भत्ता देते. 2021 या आर्थिक वर्षात सरकारने बेरोजगारी भत्ता म्हणून 15.63 हजार कोटी रुपये लोकांना वितरित केले होते. नोकरी मिळाली तर नोकरीचा विमा उतरवला जातो. तसेच नोकरी गेली तर पगार विमा कंपनी देते. पण त्यात दोन अटी आहेत, एक कंपनीत तीन वर्षांसाठी आणि दुसरी एक वर्षासाठी विमा पॉलिसीमध्ये भरलेली असावी.

तुम्ही केव्हाही अभ्यास करु शकता - इथे अभ्यासाबाबत खूप जागरुकता आहे. मोठे झाल्यावरही लोक अभ्यास करतात. इथे सरकार दरवर्षी मुलांच्या शिक्षणावर सरासरी साडेआठ लाख रुपये खर्च करते. 2017 मध्ये हा देश शिक्षणाच्या बाबतीत जगात चौथ्या क्रमांकावर होता. यासोबतच लोक त्यांना हवा तसा अभ्यास करु शकतात आणि त्यांना पाहिजे तेव्हा सर्व खर्च सरकार उचलते. यानुसार शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रम तयार केला जातो, जेणेकरुन तरुणांना सहज नोकऱ्या मिळू शकतील.

Prime Minister Narendra Modi
युक्रेन युद्धादरम्यान 8 युरोपियन नेते भारतात पंतप्रधान मोदींच्या भेटीला

75 वर्षांवरील सरासरी वय - आनंदी राहण्याच्या बाबतीत डेन्मार्क जगात पहिल्या क्रमांकावर आहे. इथे सर्व वयोगटातील लोक आनंदाने राहतात. या कारणास्तव, लोकांचे सरासरी वय 75 वर्षांपेक्षा जास्त आहे. लोकांच्या आरोग्याकडेही सरकार लक्ष देते. त्यामुळे येथील आरोग्य धोरणे अधिक चांगली आहेत. त्यांच्यावर सरकारकडून मोठा खर्चही केला जातो. 2019 च्या अर्थसंकल्पात एकूण जीडीपीच्या 9.96 टक्के आरोग्यावर खर्च करण्यात आला. हा खर्चही दरवर्षी वाढत जातो. शासनाकडून जनतेला मोफत आरोग्य सेवा दिली जाते.

कोणीही बेघर नाही - डेन्मार्कमध्ये जगातील सर्वात कमी गरीब लोक राहतात. लोक सुशिक्षित आहेत आणि बेघर देखील नाहीत. खुद्द सरकारनेच आपल्या एका अहवालात याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले की, देशातील जवळपास सर्व लोकांकडे राहण्यासाठी घरे आहेत. त्यामुळे देशाचा जीडीपीच नाही तर दरडोई उत्पन्नही इतर देशांच्या तुलनेत अधिक आहे.

Prime Minister Narendra Modi
युरोपियन युनियन चित्रपट महोत्सव यंदा ऑनलाइन

मुलांचे नाव ठेवण्याबाबत कायदे - वर्ल्ड अ‍ॅटलस वेबसाइटनुसार, डेन्मार्कमध्येही मुलांचे नाव ठेवण्याबाबत कायदा आहे. सरकारने काही नावे निश्चित केली आहेत. यापैकी एक निवडून, पालक त्यांच्या मुलाचे नाव ठेवू शकतात. त्यांना इतर कोणतेही नाव ठेवायचे असेल तर त्यांना चर्चची परवानगी घ्यावी लागेल. मग सरकारी अधिकारी चौकशी करुन नाव मंजूर करतात. इथे पीटर हे नाव पुरुषांमध्ये आणि अ‍ॅनी हे महिलांमध्ये सर्वाधिक आढळते.

लोकांना पोहायला आवडते- डॅनिश सरकार लोकांना तंदुरुस्त ठेवण्यासाठी पोहायला प्रोत्साहन देते. म्हणूनच इथल्या बहुतेक लोकांना पोहायला येते. इथला समुद्र फार दूर नाही. म्हणूनच बहुतेक शहरांतील लोकांना पोहायला आवडते. सरकारने देशभरात जलतरणासाठी शाळाही स्थापन केल्या आहेत. जिथे सर्व वयोगटातील लोक येऊन पोहायला शिकू शकतात. यासोबतच आंतरराष्ट्रीय जलतरण तलावही बांधण्यात आले आहेत, जिथे जगभरातील लोक येऊन पोहणेच नव्हे तर स्वत: पोहायलाही शिकू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com