युरोपियन युनियन चित्रपट महोत्सव यंदा ऑनलाइन

30 नोव्हेंबरपर्यंत सिनेप्रेमींना 37 भाषांमधील 60 चित्रपट ऑनलाइन पाहता येणार आहेत.
युरोपियन युनियन चित्रपट महोत्सव यंदा ऑनलाइन
युरोपियन युनियन चित्रपट महोत्सव यंदा ऑनलाइन Dainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात दरवर्षी होणारा युरोपियन युनियन फिल्म फेस्टिवल (European Union Film Festival) यंदा ऑनलाइन स्वरूपात होणार आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत सिनेप्रेमींना 37 भाषांमधील 60 चित्रपट ऑनलाइन पाहता येणार आहेत. या महोत्सवात दिग्गज भारतीय चित्रपट निर्माते सत्यजित रे यांनाही श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे.

युरोपियन युनियन चित्रपट महोत्सव यंदा ऑनलाइन
मणिकर्णिका आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनात चित्रकार दिलेश हजारे यांचे चित्र

महोत्सवाच्या 26 व्या आवृत्तीत पुरस्कार- विजेत्या युरोपियन सिनेमाच्या आभासी अवतरात "विंडो टु युरोप" (Window to Europe) प्रदान करण्याचे वचन दिले आहे. ही युरोपियन सिनेमा संस्कृतीची विविधता साजरी करते. फिल्म फिस्टिवल आणि संबंधित इव्हेंटमध्ये प्रवेश घेण्यासाठी चित्रपटप्रेमी विनामूल्य नोंदणी करू शकतात. युरोपियन युनियनच्या प्रतिनिधि मंडळाने हा महोत्सव आयोजित केला आहे.

सत्यजित रे यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी, या महोत्सवात 'पाथेर पांचाली' (Pather Panchali) हा मुख्य कार्यक्रम सादर केला जाईल. धर्मशाळा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाद्वारे तयार करण्यात आलेल्या विशेष समकालीन भारतीय विभागात चार भारतीय भाषांमधील हिंदी, मराठी, मल्याळम आणि बंगाली या सहा चित्रपटांचा समावेश आहे. EUFF सिनेमा रिट्रोव्हॅटो फेस्टिव्हलच्या सहकार्याने, डिजिटल रिस्टोअर आणि रीमास्टर केलेल्या चित्रपटांचा संच होस्टिंग करून युरोपच्या सिनेमॅटिक वारशालाही श्रद्धांजली देईल.

युरोपियन युनियनचे भारतातील राजदूत उगो अस्तुटो म्हणाले. "युरोपीयन फिल्म फेस्टिवलची 26 आवृत्ती प्रेक्षकांना यांच्या कथाकारांच्या नजरेतून संपूर्ण खंडाच्या प्रवासात घेवून जाईल. आमच्या शेवटच्या आवृत्तीनंतरच्या अतिशय सकारात्मक अभिप्रायाने आम्हाला युरोप आणि भारत या दोन्ही देशांमधील उत्कृष्ट कृतींचा एक विभाग पुन्हा समाविष्ट करण्यास प्रोत्साहन केले आहे.

प्रेक्षक फेस्टिवल स्कोप आणि EUFF वेबसाईटवर नोंदणी करू शकतात. महोत्सवात ऑस्ट्रिया, बेल्जियम, बल्गेरिया, क्रोएशिया, सायप्रस, झेकिया, एस्टोनिया, फिनलंड, ग्रीस, लॅटव्हिया, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, माल्टा, रोमानिया, स्लोव्हाकिया, स्लोव्हेनिया आणि स्वित्झर्लंडसह 27 युरोपीय देशांमधील चित्रपट प्रदर्शित केले जातील.

युरोपियन युनियन चित्रपट महोत्सव यंदा ऑनलाइन
नुसरत जहां यांचा ‘डिक्शनरी’ चित्रपट ‘इंडियन पॅनोरामा’तून वगळला!

या EUFF India 2021 आवृत्तीमध्ये सादर केलेल्या विविध प्रकरच्या आणि विविध प्रकारच्या चित्रपटांद्वारे, आम्हाला समानता आणि स्वातंत्र्याच्या हक्कासाठी एकत्र उभ्या असलेल्या लोकांच्या कथा जाणून घेत येतील, शाळेत जाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या मुलांचे आवाज एकू. हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आपल्या ग्रहाचे रक्षण करण्यासाठी आमच्या पिढीला जागरूक करू असे EUFF चित्रपट क्युरेटर वेरोनिका फ्लोरा यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com