पेरूच्या पोपनी केला ट्रम्पचा पोपट...!

Pope Leo vs Donald Trump: आपण मानवी प्रजाती म्हणून मुळातच घाबरलेले, दुष्ट आणि हिंसक आहोत. पण आपल्यात प्रेम, शांती आणि बंधुत्वाचीही क्षमता आहे. राष्ट्रांमध्ये आणि लोकांमध्ये एकोपा निर्माण करण्याची ताकद आपल्यात आहे.
Pope Leo vs Donald Trump
Pope Leo vs Donald TrumpDainik Gomantak
Published on
Updated on

तुम्ही स्वत: जमिनीत डोके खुपसून घेणारे शहामृग नसाल तर सध्या सुरू असलेले वाक् युद्ध तुमच्या कानात गेलेच असेल.

नैतिकता, शांतता आणि माणुसकी विरुद्ध अंधकार, क्रौर्य आणि अहंकार यांत सुरू आहे. थोडक्यात सांगायचे तर, पोप लिओ (चौदावे) व आपल्या आयुष्यासह अमेरिकेचेही वाटोळे करावयास निघालेल्या ट्रम्पतात्या यांच्यातील हे युद्ध आहे. हे दोन व्यक्तींमधले युद्ध नसून दोन भिन्न विचारसरणींमधले हे युद्ध आहे.

वास्तविक, दोन टोकाच्या अमेरिकन विचारसरणींमधली ही लढत असल्याचे चित्र रंगवले जात असले, तरी ते सर्वस्वी तसे नाही. त्यामागे बरीच मोठी पार्श्‍वभूमी आहे. आपण सर्वांनी ट्रम्प आणि त्यांच्या भेकड चमच्यांवर तुटून पडण्याचे आणि पोप लिओंनी ते इतक्या स्पष्टपणे मांडण्याचे कारण म्हणजे ७ एप्रिलच्या रात्रीची ट्रम्पची ’ट्रुथ सोशल’वरची ती पोस्ट: ‘आज रात्री एक संस्कृती मरेल, जी पुन्हा कधीच जिवंत होणार नाही’.

‘गोऱ्या’ वसाहतवाद्यांनी जगभरातील संस्कृती क्रूरपणे संपवल्या. त्याच वर्चस्ववादी वसहातवादाचे प्रतिनिधित्व ट्रम्प करत आहेत. त्यांनी शतकानुशतके नेमके हेच केले आहे. मग ती रेड इंडियन, अझ्टेक, मायने, ऍबोरिजिनल, आफ्रिकन अशा अनेक निसर्गपूजक संस्कृतींची ही यादी न संपणारी आहे. ‘किल द इंडियन, सेव्ह द मॅन’ हे ब्रीदवाक्य वापरत गोऱ्या वसाहतवाद्यांनी रेड इंडियन्सना संपवले.

Pope Leo vs Donald Trump
Goa Weather: कडक उन्हात पावसाची एन्ट्री; राज्यात पुढील तीन दिवस 'अवकाळी'चे संकट, 'यलो अलर्ट' जारी

१५६२साली ’मानी’ या शहरात मायन लिपीतील हजारो ग्रंथ(हजारो वर्षांचा इतिहास, खगोलशास्त्र आणि गणिताचे ज्ञान असलेले), पुस्तके आणि मूर्ती ’सैतानी’ ठरवून या वसाहतवाद्यांनी जाळून टाकल्या. अझ्टेक लोकांच्या ऐतिहासिक नोंदी आणि धार्मिक ग्रंथ नष्ट केले, जेणेकरून नवीन पिढीला त्यांच्या पूर्वजांच्या महानतेचा विसर पडेल. अझ्टेक लोकांचे मुख्य मंदिर ’टेम्पलो मेअर’ (ढशाश्रिे चरूेी) पाडून त्याच जागी त्याच्याच दगडांचा वापर करून ’मेट्रोपॉलिटन कॅथेड्रल’ वसाहतवाद्यांनी बांधले.

स्थानिक भाषांऐवजी स्पॅनिश आणि लॅटिन भाषेचा सक्तीने वापर सुरू केला. अझ्टेक सरदार आणि श्रीमंतांच्या मुलांना त्यांच्या कुटुंबापासून तोडून निवासी शाळांमध्ये ठेवले गेले. तिथे त्यांना त्यांची संस्कृती कशी ’बर्बर’ आहे हे शिकवण्यात आले. ’डॉक्ट्रीन ऑफ डिस्कव्हरी’चे समर्थन करत स्थानिकांच्या जमिनी बळकावण्याचे ‘पवित्र’, ’पुण्य’कर्म केले. वसाहतवाद्यांनी या संस्कृतींची केवळ राजकीय व्यवस्थाच मोडली असे नव्हे तर त्यांचे शिक्षण, भाषा आणि श्रद्धा बदलून त्या संस्कृतींचा ऐतिहासिक धागाच अंत्यत क्रूरतेने तोडून टाकला. शतकानुशतके या संस्कृतींना ज्या पाशवीपणाने आणि रानटीपणाने मिटवले गेले, त्याचीच पुनरावृत्ती ट्रम्प करू पाहत आहेत.

पोप लिओ जरी अमेरिकन असले, तरी त्यांनी आपल्या आयुष्याचा बराच काळ पेरूचे बिशप म्हणून घालवला आहे; त्यामुळे ’कॉन्क्विस्टॅडोर्स’नी (स्पॅनिश आक्रमकांनी) संस्कृती

कशा चिरडल्या, याचा त्यांना चांगलाच अनुभव आहे. फ्रान्सिस्को पिझारोसारख्या आक्रमकांनी ’इन्का’ साम्राज्याचा सम्राट अटाहुआल्पा याला कैद करून ठार मारले. स्थानिकांचे सूर्यमंदिर पाडून त्यावर चर्च बांधले गेले. त्यांचे जुने देव आणि पवित्र वस्तू ’सैतानी’ ठरवून नष्ट केल्या. स्थानिक ’क्वेचुआ’ भाषेऐवजी स्पॅनिश आणि लॅटिन लादली गेली. ज्यांनी आपली जुनी पद्धत सोडली नाही, त्यांचा ’इन्क्विझिशन’च्या माध्यमातून नरसंहार करण्यात आला.

आता जेव्हा ट्रम्प यांनी जेव्हा ‘इराणमधील संपूर्ण संस्कृती नष्ट होईल’ असा इशारा दिला, तेव्हा मात्र पाणी डोक्यावरून गेले. पोपनी आपला मवाळपणा सोडला व या तांबड्या तोंडाच्या व नारंगी केसांच्या माकडाला चक्क शिंगांवर घेतले. पोप यांनी त्याला ‘स्वीकारण्यास अयोग्य’ म्हणत आव्हान दिले. पोपवर चिखलफेक करून आणि त्यांना वादात ओढून झाल्यानंतर ट्रम्पला उपरती झाली, की त्याने आणि इस्राइलने सुरू केलेल्या या वेडगळ युद्धाची ‘उलटी गिनती

सुरू झाली आहे. हे युद्ध जेव्हा कधी संपेल, तेव्हा पोपचा हस्तक्षेप इतिहासात एक ’मैलाचा दगड’ म्हणून नोंदवला जाईल.

अर्थात, कोलमडणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेचाही मोठा फटका बसला होताच. ’होरमुझ’च्या एका चिंचोळ्या समुद्रधुनीमुळे संपूर्ण जागतिक परिसंस्था कोसळण्याची भीती होती. नाटो मित्रराष्ट्रांनी युद्धात सामील व्हायला नकार दिला होता. ’मोसाद’ची गुप्तचर माहिती निव्वळ थापा होती. व्हिक्टर ऑर्बनचा पराभव झाला होता. या सर्व गोष्टींनी भूमिका बजावलीच. पण पोप आपल्या ध्येयावर ठाम होते. त्यामुळेच बाजी पलटली यात शंकाच नाही. पेरूच्या पोपनी ट्रम्पचा असा काही पोपट केला, की ज्याचे नाव ते!

पोप लिओंनी या विनाशकारी युद्धाला जबाबदार असलेल्या हुकूमशहांचा समाचार घेतला, ते योग्यच होते. पण त्यांनी इराण चालवणाऱ्या व बिघडवणाऱ्या ’वेड्या मुल्लां’नाही चांगलंच फटकारायला हवं होतं. खोमेनी आणि त्याचे अत्याचारी लोक वर्षानुवर्षे आपल्याच नागरिकांना मारत आहेत. या संघर्षात त्यांना कोणीच जाब विचारलेला नाही.

पोपनी या भयानक युद्धाचा सामना करताना विलक्षण तेज, शालीनता आणि एका ’रॉकस्टार’सारखं धाडस दाखवलं. इतर धर्माच्या नेत्यांनीही आपल्याकडच्या हुकूमशहांना असंच लगाम घातली असती तर किती बरं झालं असतं! ज्यू रब्बींनी एकमुखाने बिबीच्या (नेतान्याहू) नरसंहाराच्या दौऱ्यांचा निषेध करायला हवा. इस्लामिक विद्वानांनी आपल्या हुकूमशहांच्या विरोधात ओरडून लोकशाहीची बाजू घ्यायला हवी. रशियन ऑर्थोडॉक्स चर्चच्या प्रमुखांनी पुतिनचे लाड करणं थांबवायला हवं. ही यादी न संपणारी आहे.

त्याचप्रमाणे, इकडे भारतातही अल्पसंख्याकांवर अत्याचार करणाऱ्या ‘हिंदुत्व’वाद्यांची कानउघाडणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने करायला हवी होती. ५००० वर्षांच्या हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणे-नक्कीच हो. पण त्यासाठी अल्पसंख्याकांना तुडवणे-मुळीच नाही.

Pope Leo vs Donald Trump
Goa Crime: पगार-जेवणाच्या वादातून साळगाव 'दुहेरी हत्याकांड', पाच महिन्यांनंतर संशयित ओडिशातून जेरबंद

मला नेहमी एकच प्रश्न पडतो, व्हिएतनाम युद्ध २१ वर्षे का खेचले गेले आणि हे युद्ध काही महिन्यांतच कसे काय संपू शकते? याचे श्रेय सोशल मीडियाला जाते. व्हिएतनाममध्ये माहिती लोकांपर्यंत पोहोचायला, त्यावर प्रक्रिया व्हायला आणि संताप निर्माण व्हायला वर्षे लागली; पण इथे इन्स्टाग्राम, फेसबुक आणि टिक-टॉकमुळे जागतिक स्तरावर संतापाची लाट विजेच्या वेगाने पसरली.

थोडक्यात सांगायचं तर, आपण मानवी प्रजाती म्हणून मुळातच घाबरलेले, दुष्ट आणि हिंसक आहोत. पण आपल्यात प्रेम, शांती आणि बंधुत्वाचीही क्षमता आहे. राष्ट्रांमध्ये आणि लोकांमध्ये एकोपा निर्माण करण्याची ताकद आपल्यात आहे. जगाचा अंत होईल अशा भयानक परिस्थितीतही, आपण मानवांतला उपजत चांगुलपणा शोधून काढतोच. आपल्याला वेळ लागेल, पण आपण तिथे नक्की पोहोचू.

फक्त इतकंच म्हणतो, पोप लिओ तुम्ही भर वादळवाऱ्यात एक पणती पेटवली, त्याबद्दल तुमचे कौतुक करावे, तेवढे थोडे आहे! ता. क.: माझा देवाच्या संकल्पनेवर विश्वास नाही, पण हा काव्यात्म न्याय सांगावासा वाटतो. प्राचीन पर्शियन भाषेत ’अहुरा’ म्हणजे प्रभू/देव आणि ’माझदा’ म्हणजे ज्ञान/शहाणपण. काळाच्या ओघात त्याचा अपभ्रंश ’ओरमुझ’ होत होत ’होरमुझ’ असा झाला. ज्या देवाने ज्ञानाचा प्रकाश दिला, त्याच देवाच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या खिंडीत आज जगाचा ऊर्जेचा स्रोत (तेल व्यापार) अडकून पडला आहे. ज्या ’ईश्वराची’ संकल्पना विशाल विश्वासाठी होती, त्याचे नाव आज एका चिंचोळ्या भौगोलिक पट्यात बंदिस्त झाल्यासारखे वाटते. संस्कृतींचा नाश करणाऱ्यांसाठी किंवा जागतिक राजकारणात वर्चस्व गाजवणाऱ्यांसाठी ही जागा आज ’शहाणपणाची’ नाही, तर ’युद्धाची ठिणगी’ बनली आहे.

- डॉ. ऑस्कर रिबेलो

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com