Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिसांनी काढला निषेध मोर्चा, जाणून घ्या नेमकं प्रकरण

Pakistan: आतापर्यंत दहशतवाद्यांना प्रोत्साहन देऊन शेजारी देशांना त्रास देणारा पाकिस्तान आता अडचणीत आला आहे.
Peshawar Bomb Blast
Peshawar Bomb BlastDainik Gomantak
Published on
Updated on

Peshawar Bomb Blast: आतापर्यंत दहशतवाद्यांना प्रोत्साहन देऊन शेजारी देशांना त्रास देणारा पाकिस्तान आता अडचणीत आला आहे. एकीकडे देशात आर्थिक संकट आहे, तर दुसरीकडे दहशतवादी धुमाकूळ घालत आहेत.

अशा परिस्थितीत देशातील जनताच त्रस्त नाही तर सरकार आणि प्रशासनाचीही झोप उडाली आहे. परिस्थिती अशी झाली आहे की, दहशतवाद्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांना आंदोलन करणे भाग पडले आहे.

होय, पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील विविध भागात पोलिसांनी मशीद संकुलातील बॉम्बस्फोटाचा निषेध करण्यासाठी निषेध मोर्चा काढला.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत.

24 हून अधिक पोलिस बुधवारी पेशावर प्रेस क्लबच्या बाहेर जमले आणि त्यांनी शांततेसाठी घोषणा दिल्या, डॉनने हे वृत्त दिले. पेशावरमधील पोलिस (Police) लाइन्समधील मशिदीत झालेल्या स्फोटाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.

Peshawar Bomb Blast
Peshawar Bomb Blast: पेशावर मशिदीत नमाजनंतर स्फोट; 56 ठार, 190 हून अधिक जखमी

पाकिस्तानात पोलिस न्यायाची मागणी करत आहेत

वेगवेगळ्या घोषणा असलेले फलक घेऊन पोलिसांनी सांगितले की, 'खैबर पख्तूनख्वा पोलिसांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध आम्हाला आवाज उठवायचा आहे.' प्रांतातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या बिघडलेल्या परिस्थितीमुळे त्यांना रस्त्यावर उतरावे लागले. दहशतवादी (Terrorist) हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळावा अशी मागणीही त्यांनी केली.

मरदानमध्ये पोलिस जमा झाले

मरदानमध्ये, डॉनच्या वृत्तानुसार, पोलीस स्थानिक प्रेस क्लबच्या बाहेर जमले आणि कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांच्या संरक्षणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले.

Peshawar Bomb Blast
Nigeria Bomb Blast: नायजेरियातील बॉम्बस्फोटात 50 हून अधिक मेंढपाळ ठार

पेशावर बॉम्बस्फोटाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी

स्वाबीमध्ये, पोलीस कर्मचारी जिल्हा मुख्यालयाबाहेर जमले. त्यानंतर त्यांनी पेशावर बॉम्बस्फोटाच्या निषेधार्थ कर्नाल शेरखान चौकाकडे कूच केली, असे वृत्त डॉनने दिले.

आंदोलकांनी आत्मघातकी हल्ल्याच्या निषेधार्थ विविध घोषणांचे फलक हातात घेतले होते. अज्ञातांकडून आपली हत्या करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. पेशावर बॉम्बस्फोटाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com