Weird Marriage Rituals: जगात असाही एक देश, जिथे लग्नासाठी चोरतात दुसऱ्याची बायको

या देशामध्ये लग्न करण्यासाठी मुलाला आधी दुसऱ्याची बायको चोरावी लागते.
Marriage
MarriageDainik Gomantak

Weird Marriage Rituals: जगभरात विविध जाती आहेत.यामुळे त्या त्या जातींमध्ये लग्नाच्या प्रथा देखील वेगवेगळ्या असतात. पण तुम्ही कधी अशा परंपरेबद्दल वाचले आहे का, जिथे लग्न करण्यासाठी मुलाला आधी दुसऱ्याची बायको चोरावी लागते.

  • आफ्रिकेतील वोडाब्बे जमातीची प्रथा

पश्चिम आफ्रिकेत वोडाबे जमातमध्ये ही प्रथा आहे. यामुळे ही प्रथा सर्वांनाच चकित करते. इथे लग्न करण्यापूर्वी पुरुषांना दुसऱ्या पुरुषाची बायको चोरावी लागते. अशा प्रकारे विवाह करणे ही या जमातीची ओळख आहे.

  • लग्न करायचे अशेल तर दुसऱ्याची बायको चोरावी लागते

डेली मेलच्या रिपोर्टनुसार, येथे पहिले लग्न करण्यासाठी कुटुंबीयांची संमती आवश्यक आहे. पण जर दुसऱ्या लग्नाची गोष्ट असेल तर आधी पुरुषांना दुसऱ्या पुरुषाची बायको चोरावी लागते. ज्या लोकांना दूसऱ्याची बायको चोरता येत नाही, ते दुसरे लग्न करू शकत नाहीत.

Marriage
Amritsar: बीएसएफ जवानांची मोठी कारवाई, अमृतसरमध्ये पुन्हा पाडले पाकिस्तानी ड्रोन; 3.2 किलो हेरॉइन जप्त
  • गेरेवोल लोक आझही प्रथा पाळतात

गेरेवोल लोक आजही या प्रथेचे पालम करत आहेत. त्यामुळे दरवर्षी गेरेवोल महोत्सवाचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये मुलं कपडे घालून चेहऱ्यावर रंग लावतात. यानंतर ते नृत्य आणि इतर अनेक माध्यमांनी इतरांच्या बायकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.

  • यश मिळाल्यानंतर लग्न करतात

या दरम्यान महिलेच्या पतीला याची माहिती होणार नाही, याची काळजी घ्यावी लागते. एखादी स्त्री दुसऱ्या पुरुषासोबत पळून गेली तर लोक त्या दोघांना शोधून त्यांचे लग्न लावून देतात. ही परंपरा फार वेगळी आहे.

  • महिला घेतात पुरुषांची परीक्षा

विशेष म्हणजे या महोत्सवात पुरुषांच्या सौंदर्याची परीक्षा घेणार्‍या महिला न्यायाधीश असतात. जो पुरुष सर्वात आकर्षक असतो, महिला न्यायाधीश तिला हवे असल्यास त्याच्याशी लग्न करू शकतात, जरी महिला न्यायाधीश आधीच विवाहित असेल तरी सुद्धा लग्न करु शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com