PoK मध्ये पाकिस्तानी सैन्याचा रक्तरंजित थरार! भीषण गोळीबारात 4 बालकांसह 18 जणांचा मृत्यू; जखमींना उचलणाऱ्यांवरही झाडल्या गोळ्या

POK Rawalakot Pakistan Army Attack: पाकव्याप्त काश्मीरमध्ये मुझफ्फराबादपासून अवघ्या 41 किलोमीटर अंतरावर असलेल्या रावलाकोट शहरात आसिम मुनीर यांच्या पाक सैन्याने क्रूरतेची सीमा ओलांडली.
POK Rawalakot Pakistan Army Attack
POK Rawalakot Pakistan Army AttackDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

POK Rawalakot Pakistan Army Attack: पाकव्याप्त काश्मीरमध्ये मुझफ्फराबादपासून अवघ्या 41 किलोमीटर अंतरावर असलेल्या रावलाकोट शहरात आसिम मुनीर यांच्या पाक सैन्याने क्रूरतेची सीमा ओलांडली. गेल्या 5 महिन्यांपासून स्वस्त धान्य, अन्नधान्याचे कमी दर आणि मूलभूत हक्कांच्या मागण्यांसाठी शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या निःशस्त्र आंदोलकांवर पाकिस्तानी सैन्याने युद्ध पुकारल्यासारखा हल्ला चढवला.

शुक्रवारी (6 नोव्हेंबर) सकाळी रावलाकोट येथील बस टर्मिनसवर आंदोलक जमा होत असतानाच पूर्वतयारी करुन बसलेल्या सैन्याने त्यांच्यावर थेट 'RPG-7' रॉकेट आणि ड्रोन्सच्या साहाय्याने बॉम्बवर्षाव केला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे लोकांमध्ये हलकल्लोळ उडाला. जीव वाचवण्यासाठी पळणाऱ्या लोकांवर पाकिस्तानी सैन्याने अंदाधुंध फायरिंग केली.

POK Rawalakot Pakistan Army Attack
PoK Election Violence: "गोळीबार, हत्या अन् मतपेट्यांची जाळपोळ!" पीओकेत निवडणुकीदरम्यान रक्तापात; पोलिसांच्या फायरिंगमध्ये 9 जणांचा मृत्यू

या निर्दयी आणि अमानुष कारवाईत 4 निष्पाप मुलांसह 18 जणांचा जागीच मृत्यू झाला तर डझनहून अधिक आंदोलक गंभीर जखमी झाले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, जखमींना उचलून सुरक्षित स्थळी घेऊन जाणाऱ्या नागरिकांवरही सैन्याने गोळ्यांची बरसात केली, ज्यामुळे अनेक मृतदेह उचलण्याची संधीही लोकांना मिळाली नाही. आंदोलकांवर वस्तीच्या भागात रॉकेट डागण्यात आल्याने अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. शहरात अनेक ठिकाणी भीषण आग लागली.

POK Rawalakot Pakistan Army Attack
''जोपर्यंत POK परत मिळत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी...'', कारगिल भूमीवरुन राजनाथ सिंह यांचा हल्लाबोल; सीमापार दहशतवादाचा कायमचा करणार बंदोबस्त

PoK मध्ये जून महिन्यापासून 'ज्वाइंट आवामी ॲक्शन कमिटी'च्या आवाहनावरुन आंदोलन सुरु आहे. मात्र, शाहबाज शरीफ सरकारने जनतेचे ऐकण्याऐवजी या कमिटीच्या नेत्यांना तुरुंगात डांबले आणि संघटनेवर बंदी घातली. त्यामुळे संपूर्ण पीओकेमध्ये असंतोष उफाळून 'पाकिस्तानपासून स्वातंत्र्याचे' नारे घुमू लागले. यानंतर चिडलेल्या सरकारने थेट लष्कराला मैदानात उतरवले. स्थानिकांच्या दाव्यानुसार पाकिस्तानी रेंजर्स घरांना लक्ष्य करुन महिला आणि लहान मुलांवर गोळीबार करत असून, आतापर्यंत या हिंसाचारात 150 हून अधिक नागरिकांचा बळी गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.