POK पेटलं! संतप्त बंडखोरांनी पाकिस्तानी सैन्याचं उडवलं हेलिकॉप्टर; 21 सैनिक ठार

Pakistan Military Mi17 Chopper Crash: बंडखोरांच्या हल्ल्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले असून, त्यामध्ये बसलेले सर्वच्या सर्व 21 सैनिक जागीच ठार झाले.
Pakistan Military Mi17 Chopper Crash
Pakistan Military Mi17 ChopperDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Military Mi17 Chopper Crash: पाकिस्तानव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेमध्ये आता परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर गेली असून, तिथल्या सामान्य जनतेने पाकिस्तानी सैन्याविरुद्ध सशस्त्र बंड पुकारले. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, स्थानिक बंडखोरांनी पाकिस्तानी सैन्याच्या एका अत्याधुनिक 'एमआय-17' हेलिकॉप्टरला थेट लक्ष्य केले. हे हेलिकॉप्टर 21 पाकिस्तानी सैनिकांना घेऊन मुझफ्फराबादच्या दिशेने जात होते.

बंडखोरांच्या हल्ल्यामुळे हे हेलिकॉप्टर कोसळले असून, त्यामध्ये बसलेले सर्वच्या सर्व 21 सैनिक जागीच ठार झाले. नेहमीप्रमाणे पाकिस्तानी सैन्याने आपल्यावरील नामुष्की लपवण्यासाठी हा हल्ला नसून केवळ तांत्रिक बिघाडामुळे झालेला अपघात असल्याचा दावा केला. मात्र, दुसरीकडे पीओकेमधील जनतेने हा अपघात (Accident) नसून पाकिस्तानी सैन्याने आजवर केलेल्या अनन्वित अत्याचारांचा आणि जुलुमाचा नैसर्गिक परिणाम असल्याचे म्हटले.

Pakistan Military Mi17 Chopper Crash
Pakistan: 'इस्रायलला पाठिंबा दिला तर उद्ध्वस्त करु'! स्वतःच पाळलेला भस्मासूर पाकिस्तानवर उलटला; दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची खुली धमकी

सध्या संपूर्ण पाकिस्तानात सरकार आणि लष्कराच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले असून तीव्र निदर्शने करत आहेत. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाकिस्तानी रेंजर्स आणि लष्कराकडून आंदोलकांना घाबरवण्यासाठी थेट गोळीबार केला जात आहे. सैन्याच्या या अमानुष हिंसाचारात आतापर्यंत डझनभर निरपराध नागरिक मारले गेले आहेत. पाकिस्तानी लष्कराने पाठवलेली विशेष एव्हिएशन ब्रिगेड सध्या पीओकेमध्ये आंदोलकांना चिरडण्यासाठी तैनात करण्यात आली.

Pakistan Military Mi17 Chopper Crash
Pakistan Bus Accident: एक्सप्रेसवेवर काळाचा थरार, दोन बसेसची जोरदार धडक! पाकिस्तानात भीषण अपघात; 17 प्रवाशांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

इतकेच नव्हे तर तिथल्या मशिदी, मदरसा आणि सरकारी इमारतींमधून अनाउन्समेंटद्वारे थेट धमक्या दिल्या जात आहेत. शहरांच्या दिशेने कूच करणाऱ्या आंदोलकांनी सरकारी आदेशांचे उल्लंघन केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असा इशारा लष्कराकडून दिला जात आहे.

मात्र, पाकिस्तानी सैन्याच्या या धमक्यांचा पीओकेमधील धाडसी जनतेवर कोणताही परिणाम झालेला नाही. झेलम व्हॅली, ददियाल, कोटली, भीमबर आणि हजीरा यांसारख्या अत्यंत दुर्गम भागातून हजारो नागरिक मोठ्या ताफ्यांसह शहरांच्या दिशेने झपाट्याने पुढे सरकत आहेत. त्यांना रोखण्यासाठी सैन्याने अंधाधुंध गोळीबार केला, पण नागरिक मागे हटायला तयार नाहीत. स्थानिक लोकांच्या मते, लष्कराकडून मृतदेह लपवले जात असल्यामुळे प्रत्यक्षात मारल्या गेलेल्या लोकांची संख्या कितीतरी पटीने जास्त असू शकते.

Pakistan Military Mi17 Chopper Crash
Pakistan Bomb Blast: पाकिस्तान पुन्हा रक्ताळला! खैबर पख्तूनख्वामध्ये भीषण बॉम्बस्फोट; 8 ठार, 35 हून अधिक जखमी VIDEO

पीओकेमध्ये (POK) हा भडका अचानक उडालेला नाही, तर गेल्या काही दिवसांपासून तिथे प्रचंड असंतोष होता. महागाई, विजेचे वाढलेले अवाजवी दर आणि पिठाच्या टंचाईविरोधात 'जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी'ने 9 जूनपासून अधिकृत आंदोलनाची घोषणा केली होती. परंतु, संतप्त जनतेचा संयम सुटल्याने त्यांनी एक दिवस आधीच म्हणजेच 8 जूनपासूनच सर्व दुकानांचे शटर डाऊन करुन शहरांच्या दिशेने मोर्चा वळवला. पाकिस्तान सरकारने हे बंड दडपण्यासाठी पॅरा-मिलिट्री फोर्स आणि रेंजर्स तैनात करुन निशस्त्र नागरिकांवर गोळ्या झाडल्या, ज्यामुळे आता संपूर्ण पीओके पेटून उठले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com