PoK Assembly ने शारदा पीठ कॉरिडॉरबाबत मंजूर केला ठराव, पाकिस्तानला लागली मिर्ची!

Sharada Peeth Corridor: पाकव्याप्त काश्मीर (PoK) च्या असेम्बलीने पाकिस्तान सरकारला मोठा धक्का दिला आहे.
Pakistan PM Shehbaz Sharif
Pakistan PM Shehbaz SharifDainik Gomantak
Published on
Updated on

Sharada Peeth Corridor: पाकव्याप्त काश्मीर (PoK) च्या असेम्बलीने पाकिस्तान सरकारला मोठा धक्का दिला आहे.

भारताचे गृहमंत्री अमित शहा यांचा प्रस्ताव स्वीकारुन पाकव्याप्त काश्मीरच्या असेम्बलीने शारदा पीठ कॉरिडॉर तयार करण्याचा प्रस्ताव मंजूर केला.

भारतातील लोकांना शारदा पीठात जाण्याची परवानगी द्यावी, असे या प्रस्तावात म्हटले आहे. एवढेच नाही तर पाकिस्तान (Pakistan) सरकारच्या जखमेवर मीठ शिंपडताना पीओकेच्या असेम्बलीने आपल्या ठरावात म्हटले आहे की, हिंदूंना पीओकेमधील धार्मिक स्थळांना भेट देण्याची परवानगी द्यावी.

यामुळे दोन्ही देशांतील लोकांमधील सौहार्द तर वाढेलच, पण पीओकेमध्ये पर्यटनाला चालना दिल्याने स्थानिक लोकांना आर्थिक फायदाही होईल.

या पक्षाने प्रस्ताव आणला

पण, त्याहूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे, शारदा पीठ कॉरिडॉर पीओकेच्या असेम्बलीमध्ये कर्तारपूरसारखा बनवण्याचा प्रस्ताव शेख रशीद यांच्या अवामी मुस्लीम लीग पक्षाने आणला.

22 मार्च रोजी जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथील एलओसीजवळ 75 वर्षांपासून बंद असलेले शारदा मंदिर उघडण्यात आले.

यावेळी, सेवा शारदा समितीचे अध्यक्ष रवींद्र पंडिता यांनी अमित शहा (Amit Shah) यांच्याकडे पीओकेमधील शारदा पीठ हिंदूंसाठी खुले करुन तिथे कॉरिडॉर बनवण्याची मागणी केली.

त्यानंतर, रवींद्र पंडित यांच्या मागणीला उत्तर देताना खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शारदा पीठ कॉरिडॉर कर्तारपूर कॉरिडॉरसारखा बनवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते.

Pakistan PM Shehbaz Sharif
Pakistan: फाळणीच्या वेळी PAK मध्ये आलेल्या पत्रकाराने व्यक्त केली हळहळ, ‘दादा जी, वाट लगा दी...’

पाकिस्तानी जनतेला चांगलं समजलं आहे

पण, अमित शहांच्या प्रयत्नांना इतक्या लवकर फळ मिळेल आणि शारदा पीठ कॉरिडॉर तयार करण्यासाठी पीओकेची असेम्ब्ली ठराव पास करेल याची क्वचितच कुणाला खात्री होती.

वास्तविक, पीओकेमधील जनतेलाही पाकिस्तान हा उद्ध्वस्त देश असल्याचे कळले आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानपासून मुक्ती मिळवायची असेल तर भारताच्या आश्रयाला जावे लागेल, त्याच्याशी मैत्री करावी लागेल.

पाकिस्तानचे राजकारणी संतापले

अन्यथा, पीओकेचेही बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वासारखेच हाल होईल. त्यामुळे, वेळ न गमावता, PoK असेम्बलीने भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्या सल्ल्यानुसार शारदा पीठ कॉरिडॉर तयार करण्याचे मान्य केले.

तथापि, त्यांच्या संमतीला पाकिस्तानातील राजकारणी आणि उच्च पदावरील लोकांनी नाराजी दर्शवली आहे. चिडलेले माजी उच्चायुक्त अब्दुल बासित यांनी पाकव्याप्त काश्मीरच्या लोकप्रतिनिधींच्या समजुतीवर प्रश्न उपस्थित केले.

Pakistan PM Shehbaz Sharif
Pakistan Video: पाकिस्तानमध्ये हिंदू डॉक्टरची गोळ्या झाडून हत्या, ‘टार्गेट किलिंग’चा संशय

तसेच, पाकिस्तानचे राजकारणी आणि डिप्लोमॅट काश्मिरींच्या समजुतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. पण, पीओकेच्या लोकांना हे चांगलेच समजले आहे की, त्यांचा पाकिस्तानसोबत राहण्याचा निर्णय चुकीचा आहे, ज्याला आता सुधारण्याची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com