PM Modi Meets Zelensky
PM Modi Meets ZelenskyDainik Gomantak

PM Modi Meets Zelensky: रशिया-युक्रेन युद्धादरम्यान PM मोदींनी घेतली झेलेन्स्की यांची भेट, जाणून घ्या

PM Modi Meets Zelensky: जपानमधील हिरोशिमा येथे पंतप्रधान मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली.
Published on

PM Modi Meets Zelensky: जपानमधील हिरोशिमा येथे पंतप्रधान मोदींनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. रशियासोबतच्या युद्धादरम्यान दोन्ही देशांच्या प्रमुखांची भेट होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित होते. G7 शिखर परिषदेसाठी भारत, अमेरिकेसह जगातील शक्तिशाली नेते येथे दाखल झाले आहेत. यापूर्वी, पीएम मोदी आणि झेलेन्स्की यांच्यात अनेकवेळा फोनवर चर्चा झाली होती.

तत्पूर्वी, आज पंतप्रधान मोदींनी त्यांचे जपानी समकक्ष फुमियो किशिदा, फ्रान्सचे (France) अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि युक्रेनियन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर मोदी आणि झेलेन्स्की यांच्यातील बैठक नियोजित होती.

PM Modi Meets Zelensky
Russia-Ukraine War: अटक वॉरंट जारी करणाऱ्या न्यायाधीशाला पुतीन यांचा दणका, वॉन्टेड लिस्टमध्ये...!

युक्रेन युद्ध हा जगासाठी मोठा प्रश्न

व्होलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'युक्रेन युद्ध हा जगासाठी मोठा प्रश्न आहे. या युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. मी याला फक्त एक मुद्दा मानत नाही, तर माझ्यासाठी हा अर्थकारण, राजकारण आणि मानवतेचा मुद्दा आहे. युद्ध थांबवण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.'

PM Modi Meets Zelensky
Russia-Ukraine War: रशियाने युक्रेनवर टाकला 'फॉस्फरस बॉम्ब', जाणून घ्या किती धोकादायक...

पंतप्रधान मोदी तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत

गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये रशियाने (Russia) युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि झेलेन्स्की यांच्यात ही पहिलीच बैठक होती.

तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात G7 गटाच्या वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी शुक्रवारी हिरोशिमा येथे पोहोचले. जपानच्या निमंत्रणानंतर युक्रेनचे अध्यक्ष जी 7 शिखर परिषदेत सहभागी होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com