PM Modi South Africa Visit: पंतप्रधान मोदी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर

PM Modi South Africa Visit: विकासाच्या दिशेने अनेक निर्णय घेतले जातील.
PM Narendra Modi
PM Narendra ModiDainik Gomantak
Published on
Updated on

PM Modi South Africa Visit: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दक्षिण आफ्रिकेसाठी रवाना झाले आहेत. ब्रिक्सच्या 15 परिषदेसाठी मोदी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर गेल्याची माहीती समोर आली आहे.

'जोहान्सबर्ग येथे साऊथ आफ्रिकेच्या अध्यक्षतेखाली पार पडणाऱ्या ब्रिक्सच्या 15व्या परिषदेसाठी रिपब्लिक ऑफ साऊथ आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरिल रॅमाफोसा यांनी आमंत्रित केले आहे. म्हणून मी 22 ते 24 ऑगस्टदरम्यान दक्षिण आफ्रकेच्या दौऱ्यावर जाणार आहे.' असे पंतप्रधान कार्यालयाकडून जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

या ब्रिक्स परिषदेत अनेक विषयांवर चर्चा केली जाईल. विकासाच्या दिशेने अनेक निर्णय घेतले जातील. ब्रिक्स हा असा मंच आहे जो विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. एक मजबूत गट बनत आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील एक महत्वाचा गट म्हणून ब्रिक्सकडे पाहिले जाते.त्यामुळे भारता या गटाचा भाग असल्याने भारतासाठीदेखील रोजगार आणि विकासाच्या अनेक संधी निर्माण होतील.

ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांनी एकत्र येत या ग्रृपची स्थापना केली. रशिया, भारत आणि चीन हे तीन देश २००० सालपासून बैठका घेत होते. २००९ मध्ये ब्राझील आणि २०१० मध्ये दक्षिण आफ्रिकेचा या गटात समावेश झाला.

PM Narendra Modi
China Taiwan Tension: ड्रॅगला उत्तर देण्यासाठी तैवान करतोय तयारी! संरक्षण बजेटमध्ये केली भरघोस वाढ

ब्रिक्स हा शब्द अमेरिकन कंपनी गोल्डमॅन सचमध्ये काम करणाऱ्या जिम ओ'नेल या व्यक्तीने सर्वप्रथम वापरला होता. महत्वाचे म्हणजे या व्यक्तीने त्यावेळी भविष्यवाणी केली होती की, या देशांमध्ये इतकी शक्ती आहे की ते एकत्र आले तर २०५० मध्ये हे देश जगाच्या अर्थव्यवस्थेवर वर्चस्व गाजवतील.

आता ब्रिक्समध्ये काय निर्णय घेतले जाणार, भारताला कोणत्या क्षेत्रात काम करण्यास प्राधान्य मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com