Twitter: ट्विटरच्या वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! असे कमावले जाऊ शकतात पैसे

Twitter: याशिवाय अनेक वापरकर्त्यांना 5 लाख रुपयांहून अधिक नुकसानभरपाई मिळाली आहे.
Twitter | Elon Musk
Twitter | Elon Musk Dainik Gomantak
Published on
Updated on

Twitter: ट्विटरची मालकी एलॉन मस्क यांच्याकडे गेल्यापासून ट्विटर सातत्याने चर्चत आहे. सतत ट्विटरमध्ये काही ना काही बदल झाल्याचे दिसून येते. सततच्या बदलाने या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मवर बऱ्याचदा टीका होताना दिसते. आता मात्र ट्विटरच्या वापरकर्त्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे.

मिळालेल्या माहीतीनुसार, जे सतत ट्विटरवर अॅक्टीव्ह असतात आणि आपल्या फॉलोअर्सबरोबर कनेक्ट होऊ इच्छितात त्यांच्यासाठी ट्विटर नवीन प्रोग्राम घेऊन आला आहे. महत्वाचे म्हणजे या प्रोग्राममधून वापरकर्त्यांना पैसे कमावण्याची संधी मिळणार आहे.

अॅड्स रिव्हेन्यू शेअरींग असे या प्रोग्रामचे नाव आहे. यामुळे वापरकर्त्यांना आपले काम कमर्शिअल बनवण्यासाठी आणि यातून पैसे कमावण्याची संधी देत आहे.

Twitter | Elon Musk
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील इंधनाच्या दरात किरकोळ बदल; वाचा आजचे दर

कंपनीने 'क्रिएटर अॅडस रेवेन्यू शेयरिंग या पेजवर म्हटले आहे की, आम्ही क्रिएटरसाठी रेवेन्यू शेयरिंग करण्यासाठी क्रिएटर मोनेटाइजेशनचा विस्तार करत आहोत. लोकांना थेट Twitter वर पैसे कमावण्यासाठी मदत करण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे.

एका ट्विटमध्ये असेही दिसून आले आहे की लोकप्रिय YouTuber मिस्टर यांनी अॅड्स रिव्हेन्यू शेअरिंगचा भाग म्हणून Twitter वरून $25,000 म्हणजेच 21 लाख कमावले आहेत. याशिवाय अनेक वापरकर्त्यांना 5 लाख रुपयांहून अधिक नुकसानभरपाई मिळाली आहे.

जेथे स्ट्राइप पेआउटला सपोर्ट केला जातो तेथे हा प्रोग्राम सुरु करण्यात येईल. ट्विटरने म्हटले आहे की, 'आम्ही प्रारंभिक गट सुरू करत आहोत ज्यांना पेमेंट स्वीकारण्यासाठी आमंत्रित केले जाणार आहे. दरम्यान, एलॉन मस्क यांनी ट्वीटरबाबत घेतलेल्या या निर्णयाला कितपत यश मिळते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com