Israel-Palestine: इस्राइल- पॅलेस्टाइन युद्धाचा परिणाम आता इतर राष्ट्र आणि तेथील नागरिकांवरदेखील होताना दिसत आहे. आता रशियाच्या दागेस्तानमधील पॅलेस्टाइन समर्थकांनी यहुदी प्रवाशांवर हल्ला केल्याची माहीती समोर आली आहे.
मिळालेल्या माहीतीनुसार, रशियाच्या दागेस्तान एअरपोर्टवर जेव्हा पॅलेस्टाइन समर्थक नागरिकांना जेव्हा समजले की, की यहुदी नागरिक असलेले विमान दागेस्तानमध्ये उतरणार आहे तेव्हा तेथील समुहाने प्रवाशांमध्ये कोण कोण ज्यू आहेत असे विचारल्याची माहीती समोर आली आहे. यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे.
इस्रायलची राजधानी तेल अवीव येथून एक विमान दागेस्तानला आले होते. ही बाब समजल्यानंतर दागेस्तानच्या लोकांनी एका हॉटेलला घेराव घातला आणि ज्यूंचा शोध सुरू केला. यानंतर हल्ल्याच्या भीतीने इस्रायली प्रवाशांना विमानतळावर आश्रय घेण्यासाठी लपून बसावे लागले. स्थानिक आरोग्य अधिकार्यांनी माहिती दिली की हल्ल्यातून पळून गेलेल्या इस्रायली लोकांपैकी सुमारे 20 लोक जखमी झाले आहेत, त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. सुरक्षा दलांनी रॉयटर्सला सांगितले की विमानातील प्रवासी सुरक्षित आहेत.
सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये दागेस्तानमधील शेकडो तरुण दिसत आहेत. काही तरुण पॅलेस्टिनी झेंडे घेऊन जाताना दिसले. तसेच काही तरुणांनी फलक हातात घेतले होते ज्यावर इस्रायलचा निषेध करणाऱ्या घोषणा लिहिल्या होत्या.
दंगलखोरांनी हातात घेतलेल्या काही फलकांवर आम्ही ज्यू निर्वासितांच्या विरोधात असल्याचे लिहिले होते. मखचकला आंतरराष्ट्रीय विमानतळावर काही तरुण गर्दीच्या रूपात उभ्या असलेल्या विमानांमध्ये चढताना दिसले आणि काही जण विमानांच्या खिडक्या तोडताना दिसले. आता अशा घटनांमुळे अशांतता निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. आता इस्राइल( Israel )- पॅलेस्टाइन युद्धात किती वेळ चालणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.