Russia Vs Ukraine
Russia Vs UkraineDainik Gomantak

Black Out In Ukraine: रशियाचा वीज केंद्रांवर हल्ला; युक्रेनमध्ये 1 कोटी नागरिक अंधारात

युक्रेनमधील पॉवर ग्रिड रशियन लष्टराकडून लक्ष्य; वीज पुरवठा खंडीत
Published on

Black Out In Ukraine: रशिया-युक्रेन युद्धाला 9 महिने होत आले आहेत. पण युद्धाचा शेवट कधी होईल, हे कुणीही सांगू शकत नाहीय. आता रशियाने युक्रेनमधील पॉवर ग्रिड लक्ष्य केल्याने युक्रेन अंधारात बुडाला आहे. वीजपुरवठा ठप्प झाल्यने सुमारे 1 कोटी नागरिकांना अंधारात राहावे लागत आहे, अशी माहिती युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलदोमीर झेलन्स्की यांनी दिली आहे. (Russia-Ukraine War)

Russia Vs Ukraine
FIFA World Cup 2022 Tickets : एवढ्या लाखात मिळतंय 1 तिकीट; जाणून घ्या लाईव्ह स्ट्रीमिंग कसे पाहायचे

खेरसन भागातून काही दिवसांपुर्वी रशियन सैन्याने माघार घेतली होती. त्यामुळे युक्रेनने जल्लोष सुरू केला होता. पण त्यानंतर खवळलेल्या रशियाने एकामागोमाग एक अशा असंख्य क्षेपणास्त्र हल्ले चढवले. यात अनेक शहरे उद्धवस्त होत आहे. यात अनेक वीज केंद्रे उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळेच आता युक्रेनमधील लाखो लोकांना वीजेशिवाय राहावे लागत आहे.

झेलेन्स्की म्हणाले की, रशियाने पायाभूत सुविधांवर हल्ले चढवले. त्यामुळे आता लाखो लोक वीजेशिवाय आयुष्य जगत आहेत. जवळपास 1 कोटी लोकांना फटका बसला आहे. ओडेसा, विन्नित्सिया, सुमी आणि किव्ह हे भाग सर्वाधिक प्रभावित झाले आहेत.

Russia Vs Ukraine
Twitter Employee Resigns: भर बैठकीत कर्मचाऱ्यांनी एलन मस्क यांच्या तोंडावर फेकला राजीनामा

रशियाने आता निवासी भाग सोडून वीज केंद्रांवर हल्ले सुरू केले आहेत. त्यामुळे अनेक भागात भारनियमन करावे लागत आहे. रशियाने केलेल्या ताज्या क्षेपणास्त्र हल्ल्यात झपोझरिया येथील अपार्टमेंटमधील 7 जणांचा मृत्यू झाला आहे. रशियाने गॅस उत्पादन संयंत्र आणि निप्रोमधील एका क्षेपणास्त्र कारखान्यांनाही लक्ष्य केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com