Miss Universe: 'या' देशाच्या सुंदरीने जिंकला मिस युनिव्हर्स किताब

माजी मिस युनिव्हर्स भारताच्या हरनाज संधूने सोपवला मुकूट
Miss Universe | R'Bonney Gabriel
Miss Universe | R'Bonney Gabriel Dainik Gomantak
Published on
Updated on

Miss Universe: अमेरिकेतील न्यू ऑर्लिन्स शहरात झालेल्या 71व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेतून नव्या मिस युनिव्हर्सचे नाव घोषित करण्यात आले आहे. अमेरिकेच्या आर'बोनी गॅब्रिएल हीने या किताबावर स्वतःचे नाव कोरले आहे. मिस युनिव्हर्स गॅब्रिएल हिच्या माथ्यावर माजी मिस युनिव्हर्स असलेल्या भारताच्या हरनाज संधू हिच्या हस्ते मिस युनिव्हर्सचा ताज परिधान करण्यात आला. या सौंदर्य स्पर्धेत मिस यूएसए आर बोन गॅब्रिएलने 86 सुंदरींना हरवून मिस युनिव्हर्सचा ताज जिंकला आहे.

Miss Universe | R'Bonney Gabriel
Nepal Plane Crash: नेपाळमध्ये विमान कोसळून 60 प्रवासी ठार

या सुंदरींनी टॉप 3 मध्ये स्थान मिळवले

अमेरिकेतील लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरात 71 व्या मिस युनिव्हर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिकेच्या आर बोनी गॅब्रिएल, व्हेनेझुएलाच्या अमांडा डुडामेल न्यूमन आणि डोमिनिकन रिपब्लिकच्या आंद्रिया मार्टिनेझ या सुंदरी मिस युनिव्हर्सच्या टॉप 3 मध्ये पोहचल्या होत्या. व्हेनेझुएलाची अमांडा फर्स्ट रनरअप तर डॉमिनिकन रिपब्लिकची अँड्रिया मार्टिनेझ सेकंड रनरअप ठरली.

मिस युनिव्हर्स 2022 चा खिताब जिंकल्यानंतर गॅब्रिएल खूपच भावूक दिसली. तसेच तिच्या चेहऱ्यावरील विजयाचा आनंदही पाहण्यासारखा होता. मिस युनिव्हर्स आर'बॉनी गॅब्रिएलचा विजयी क्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Miss Universe | R'Bonney Gabriel
NASA Research: 'या' कारणामुळे नासाने व्यक्त केली चिंता, वाचा कारण

कोण आहे मिस युनिव्हर्स गॅब्रिएल ?

मिस युनिव्हर्स R'Bonney Gabriel 28 वर्षांची आहे. ती व्यवसायाने मॉडेल आणि फॅशन डिझायनर आहे. मिस यूएसए जिंकणारी ती पहिली फिलिपिनो-अमेरिकन आहे. कपडे डिझाईन करताना ती नेहमीच रिसायकलिंगला प्राधान्य देते, त्यातून साहित्याच्या पुनर्वापर करून प्रदूषण कमी करण्यावर तिचा भर असतो.

भारताची दिविता टॉप 16 मधून बाहेर

यावर्षी मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताकडून दिविता राय सहभागी झाली होती. पण दिविता टॉप 16 नंतर बाहेर पडली होती. तिला टॉप 5 मध्ये स्थान मिळवण्यात अपयश आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com