आर्थिक संकटात अडकलेल्या श्रीलंकेत पेट्रोलच्या दराचा भडका

तेलाच्या वाढलेल्या दरांमुळे आंदोलकांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. निषेध म्हणून लोकांनी तेथे टायर जाळले आणि राजधानीकडे जाणारे रस्ते रोखले.
SriLanka Petrol Hike
SriLanka Petrol HikeDainik Gomantak
Published on
Updated on

श्रीलंका: श्रीलंका सध्या आर्थिक संकटातून जात आहे. श्रीलंकेत आर्थिक संकटाबाबत सातत्याने सरकारविरोधी निदर्शने होत आहेत. दरम्यान, श्रीलंकेतील पेट्रोलियम कंपनी सिलोन पेट्रोलियम कॉर्पोरेशनने (CPC) पेट्रोलच्या दरात वाढ केल्याने नागरिकांवर महागाईचा बोजा वाढला आहे. याआधी इंडियन ऑइलच्या स्थानिक कर्मचाऱ्यांनी ऑपरेटिंग किमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती. (Petrol price Hike Rs 338 per liter in Sri Lanka)

SriLanka Petrol Hike
ट्विटरवर करता येणार 'ट्विट' एडीट

सध्या श्रीलंकेला (Srilanka) गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, CPC ने 92 ऑक्टेन पेट्रोलची किंमत 84 रुपयांनी वाढवून 338 रुपये प्रति लीटर केली आहे. ही किंमत आता श्रीलंकन ​​इंडियन ऑइल कंपनी (LIOC) च्या प्रति लिटर किमतीएवढी झाली आहे. CPC ने एका महिन्यात दोनदा पेट्रोलच्या किमतीत वाढ केली आहे.

वाढलेल्या दराविरोधात प्रचंड आंदोलन करण्यात आले

या वाढलेल्या तेलाच्या किमतींमुळे आज आंदोलकांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. कंपनीच्या निषेधार्थ लोकांनी तेथे टायर जाळले आणि राजधानीकडे जाणारे प्रमुख रस्ते अडवले.

10 आंदोलक जखमी

प्रत्युत्तर म्हणून या आंदोलकांवर गोळीबार करण्यात आला. एएफपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात एक आंदोलक ठार झाला असून सुमारे 10 आंदोलक जखमी झाले आहेत. आंदोलकांवर गोळीबार झाल्याची घटना मान्य करून, श्रीलंका पोलिस विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले की, जमाव हिंसक झाल्यानंतर आणि त्यांच्यावर दगडफेक केल्यानंतर त्यांना निदर्शकांवर गोळीबार करावा लागला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com