ट्विटरवर करता येणार 'ट्विट' एडीट

ट्विटरमध्ये आले हे नवे फीचर पाहून युजर्स होणार खुश!
Twitter Edit Button | Twitter New Feature
Twitter Edit Button | Twitter New FeatureDainik Gomantak
Published on
Updated on

आजच्या डिजिटल युगात अनेक बदल होताना दिसत आहेत. ट्वीटर गेल्या दिवसांपासून सोशल मिडियावर चर्चेत आहे. कारण ट्वीटरवर आता केलेले ट्विट एडिट करता येणार आहे. यामुळे अनेक युजर्समध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. कारण यापूर्वी ट्वीटरवर ट्विट एडिट करता येत नसल्याने पूर्ण ट्विटच डिलिट करून पुन्हा ट्विट करावे लागत असे. हे करतांना खूप वेळ वाया जात होता पण आता ट्वीटरवर एडिटचे बटन आल्यावर हा त्रास कमी होणार आहे. (Twitter Updates News)

ट्विटर लवकरच वापरकर्त्यांना 'एडीट बटण'(Edit Button) देण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र वापरकर्त्यांना हे फीचर मिळाले तरी, तरीही ट्विटर तुमच्या सर्व ट्विट्सची नोंद ठेवणार आहे.Twitter फक्त Twitter Blue वापरकर्त्यांसाठीच उपलब्ध करून देऊ शकते. तसेच Twitter ने या वैशिष्ट्याबद्दल याबद्दल अधिक माहिती दिलेली नाही. (Twitter edit button)

Twitter Edit Button | Twitter New Feature
...तर आम्ही हे युद्ध खूप आधीच संपवले असते: राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की

ट्विटरचे उत्पादन प्रमुख जे सुलिवन 'एडिट बटन'चे फीचर दिल्यानंतर निर्माण होणाऱ्या सुरक्षेच्या चिंतेबद्दल बोलताना म्हणाले, एडिट हे अनेक वर्षांपासून ट्विटरचे सर्वाधिक मागणी करण्यात आलेले फीचर आहे. लोकांना ट्विटमधील चुका त्याक्षणीच दुरुस्त करायच्या असतात. ते सध्या डिलीट करून पुन्हा ट्विट करावे लागत आहे. वेळ मर्यादा, नियंत्रण आणि पारदर्शकता यासारख्या गोष्टींशिवाय ट्विट एडीट करता येणे याचा गैरवापर सार्वजनिक संभाषणाचे संदर्भ बदलण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या संभाषणाची विश्वासार्हता आबाधीत ठेवणे याला आमते सर्वोच्च प्राधान्य आहे."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com