Pegasus: दुबईच्या राजकन्या लातिफा आणि हया यादेखील होत्या टार्गेट

एका तपासणी दरम्यान हे दोन्ही नंबर (Number) या यादीत असल्याचे आढळले.
Princess Latifa
Princess LatifaDainik Gomantak
Published on
Updated on

पेगासस (Pegasus) नावाच्या फोन हॅकिंग (Phone hacking) स्पायवेअरच्या हेरगिरी यादीमध्ये दुबईच्या दोन राजकन्याचे फोन नंबर (Number) आढळले आहेत. एका तपासणी दरम्यान हे दोन्ही नंबर या यादीत असल्याचे आढळले. दुबईच्या शासकांची मुलगी राजकुमारी लातिफा (Princess Latifa) आणि त्यांची माजी पत्नी राजकन्या बीट-अल-हुसेन (Haya Bint al-Hussain) यांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजकुमारी लातिफाने यांनी म्हटले होते की त्यांना बंधक बनवून ठेवले होते आणि त्याच्या जीवाला धोका होता. राजकुमारी हयाने आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगून दुबईतून पळ काढली.

Princess Latifa
"हे" आहे जगातील सर्वात महाग Ice-cream

त्यावेळी संयुक्त अरब अमिरातीने दोन्ही राजकण्यानचे आरोप फेटाळून लावले होते. या दोन्ही राजकण्यानचे नंबर इस्त्रायली आधारित कंपनी एनएसओ ग्रुपच्या ग्राहकांनी पुरविलेल्या नंबरच्या यादीत आहे. असे मानले जाते की, 50000 लोकांचे नंबर समावेश आहे. या यादी अनेक मोठ्या बातम्यामधून उघडकीस आले. राजकुमारीनचे नंबर आणि त्यांच्या काही ओळखीच्या व्यक्तींचा या यादीत शोध घेतल्याने ते या गटाच्या सहकारी ग्राहकांचे टार्गेट होते की नाही हा प्रश्न उपस्थित होतो. मानवाधिकार एमनेस्टी इंटरनॅशनलने एक निवेदन झरी केले असून असा आरोप केला आहे की या शोधणे एनएसओ गटाला मानवी हक्काच्या उल्लंघनाच्या यादीमध्ये स्थान दिले आहे.

Princess Latifa
Maglev Train: चीनची ट्रेन पळते विमानापेक्षाही वेगवान!; स्पिड ऐकून व्हाल थक्क

वस्तुस्थितीशिवाय अहवाल प्रकाशित: NSO

दुसऱ्या बाजूने एनएसओने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. असे म्हंटले आहे की हे सॉफ्टवेअर गुन्हेगार आणि दहशतवादाविरुद्ध आहे आणि केवळ सैन्य, कायदा अमलबजावणी आणि मानवी हक्काच्या चांगल्या नोंदी असलेल्या गुप्तचर संस्थानाच उपलब्ध करून देण्यात आले आहे. एनएसओने दिलेल्या निवेदनात असे म्हंटले की, 'फॉरबिडन स्टोरीज' हा अहवाल गैरसमज आणि अपुष्ट सिद्धांतानी परिपूर्ण आहे. ज्यामुळे स्त्रोतांच्या विश्वासार्हता आणि हितसंबंधाबद्दल गंभीर शंका निर्माण होते. असे दिसत आहे की 'अज्ञात स्त्रोतांनी' अशी माहिती दिली आहे. ज्याचा कोणताही वासविक आधार नाही. तसेच जी वास्तविकतेपासून खूप दूर आहे. त्यांनी असे म्हंटले आहे की आम्ही त्यांच्या अहवालात केलेल्या खोट्या आरोपांचे खंडन करतो.

Princess Latifa
...तर नीरव मोदी आत्महत्या करेल

राजकुमारी लतीफा वाली जेलमध्ये बंद होत्या

राजकुमारी लतीफा या दुबईतून पळ काढत असताना त्यांचे अपहरण करून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. सयुक्त अरब अमिरातीमध्ये पळून गेल्यानंतर आणि 2018 मध्ये हिंद महासागरात एका नावेत बसल्यावर पुन्हा त्यांना दुबईला नेण्यात आले होते,असे त्या म्हणाल्या. त्यांनी सांगितले की दुबईला पोहोचल्यावर त्यांना विला जेलमध्ये बंद करण्यात आले होते. ही बातमी समोर आल्यावर आंतरराष्ट्रीय रोष दिसून आला. जेव्हा संयुक्त राष्ट्रने राजकुमारी जीवंत आहे याचा पुरावा विचारला तेव्हा दुबईच्या राजघरण्याने सांगितले की तिची घरी देखभाल केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com