"हे" आहे जगातील सर्वात महाग Ice-cream

आइसक्रीम (Ice-cream) हा डेझर्टचा (Dessert) असा प्रकार आहे की ज्यासाठी लोक भल्ली मोठी किंमत द्यायला तयार असतात.
The most expensive ice-cream in the world
The most expensive ice-cream in the worldDainik Gomantak
Published on
Updated on

आइसक्रीम (Ice-cream) हा सर्वांचा आवडता पदार्थ आहे. कोणत्याही ऋतुत आइसक्रीम खायला आपण तयार असतो. आइसक्रीम हा डेझर्टचा (Dessert) असा प्रकार आहे की ज्यासाठी लोक भल्ली मोठी किंमत द्यायला तयार असतात. परंतु जगातील सर्वात महाग आइसक्रीम कोणते जर असा प्रश्न पडत असेल तर याची माहिती आज जाणून घेऊया. आइसक्रीमची (Ice-cream) किंमत वाचून व्हाल थक्क.

प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार दुबईमधील 'स्कुप कॅफे' मध्ये (Scoop Cafe) 'ब्लॅक डायमंड' (Black Diamond) नावाचे आइसक्रीम जगात सर्वात महागडे आइसक्रीम (Expensive Ice-cream) म्हणून ओळखले जाते. या आइसक्रीमच्या एका स्कुपची किंमत 840 डॉलर म्हणजेच 62 हजार 900 रुपये एवढी आहे. महत्वाचे म्हणजे सध्याच्या काळात 22 कॅरेट सोन्याच्या एका तोळ्यांच्या किंमतीपेक्षाही कमी आहे.

The most expensive ice-cream in the world
जेफ बेझोस यांनी अवकाश सफारीसाठी 20 जुलै हीच तारीख का निश्‍चित केली?

असे काय आहे या आइसक्रीममध्ये ?

ब्लॅक डायमंड या आइसक्रीममध्ये इटालीयन टफल्स, इराणी केसर तसेच खाण्यासारखे 23 कॅरेट सोन्याचा मुलामा वापरले जाते. फ्रेश वेनीला बिन्सच्या मदतीने या पद्धतीचे आइसक्रीम तयार केले जाते. हे आइसक्रीम तुमच्या समोरच बनवले जाते. हे आइसक्रीम एक विशिष्ट कपमध्ये सर्व्ह केल्या जाते. तसेच या आइसक्रीमला अजून आकर्षक बनवण्यासाठी काळ्या रंगाच्या किंवा गोल्डन रंगाच्या Versace Bowl मध्ये दिल्या जाते.

दुबईमधील कॅफेमध्ये हे महाग आइसक्रीम मिळते. तेथेच 23 कॅरेट खाण्यासारखे सोन्याने तयार केलेली गोल्ड कॉफी सुद्धा मिळते.

The most expensive ice-cream in the world
Covid19 Positive आल्यावर बुर्खा घालुन पत्नीच्या नावाने केला प्रवास

दुबई हे शहर पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या शहरात महाग वस्तु पाहायला मिळतात. ट्रॅव्हलर सेलिब्रिटीच्या पोस्टमुळे दुबई प्रचंड चर्चेत आहे. अभिनेत्री आणि ट्रॅव्हल व्लॉगर ट्रेझरीवाला हिने नुकतेच दुबई शहरातील महाग आइसक्रीमची चव घेतली आहे. आइसक्रीमची चव घेतानाच व्हिडिओ तिने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. हे आइसक्रीम जगातील सर्वात महाग आइसक्रीम म्हणून ओळखले जाते. या आइसक्रीमची किमत 60,000 रुपये एवढी आहे.

The most expensive ice-cream in the world
अमेरिकेत कमिशन घेताना दोन भारतीय डॉक्टर गोत्यात; 280 कोटी करणार वसूल

एवढी किंमत वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच हा प्रश्न पडला असावा की, असे एवढे आहे तरी काय या आइसक्रीममध्ये ? यात काय सोने टाकले आहे ? याचे उत्तर 'हो 'आहे. कारण या आइसक्रीममध्ये खरचं 23 कॅरेट सोन टाकले आहे. खाण्यायोग्यच असे सोन या आइसक्रीममध्ये वापरले गेले आहे. हे आइसक्रीम फ्रेश बीन्सपासून बनवल्या जाते. यात एम्ब्रोसियल इराणी केशर, इटालियन ब्लॅक ट्रफल्सही टाकल्या जाते. दुबई शहरातील जूमैरा रोडवर एक कॅफेमध्ये मिळते. विशेष म्हणजे हे आइसक्रीम Versace या इटालियन लक्झरी फॅशन कंपनीच्या महागड्या बाउलमध्ये दिल्या जाते. यामुळेच या आइसक्रीमची किंमत कह्हुप महाग आहे. म्हणूनच हे आइसक्रीम ब्लॅक डायमंड आइसक्रीम म्हणून ओळखल्या जाते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com