Talibanबरोबर शांततापूर्ण मार्गाने चर्चेस पंजशीर तयार

तालिबानने (Taliban) पंजशीर (Panjshir) आणि अंदराब भागातील हल्ले त्वरीत थांबवून तेथील आपल्या हलचाली बंद केल्या तर NRF देखील ही लढाई थांबविण्यास तयार आहे. असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
पंजशीरमध्ये (Panjshir) तालिबानला (Taliban) लढा देणाऱ्या संघटनांनी आता शांतता मार्गाने काढण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
पंजशीरमध्ये (Panjshir) तालिबानला (Taliban) लढा देणाऱ्या संघटनांनी आता शांतता मार्गाने काढण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.Dainik Gomantak
Published on
Updated on

पंजशीरमध्ये (Panjshir) तालिबानला (Taliban) लढा देणाऱ्या संघटनांनी आता शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, तालिबान, पाकिस्तान (Pakistan) आणि अल कायदा यांच्या सततच्या हल्ल्यांना कंटाळून आता युध्दविराम देत चर्चेतून (discussion) यावर तोडगा काढायचा आहे. तालिबानविरोधी मिलिशिया आणि माजी अफगाण सुरक्षा दलांनी बनलेले नॅशनल रेझिस्टन्स फ्रंटचे (NRF) हे तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यापासून बंडखोरांसोबत लढत आहेत.

पंजशीरमध्ये (Panjshir) तालिबानला (Taliban) लढा देणाऱ्या संघटनांनी आता शांतता मार्गाने काढण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
पंजशीरसमोर तालिबान हतबल, 40 मृतदेह सोडून काढला पळ

कार्यवाहक राष्ट्रपती अमरुल्ला सालेह आणि दिवंगत मुजाहिद्दीन कमांडर अहमद शाह मसूद यांचे पुत्र अहमद मसूद हे दहशतवादी गटाच्या विरोधात सर्वतोपरी प्रयत्न करत लढा देत आहेत. याआधी, सालेह यांनी संयुक्त राष्ट्रांना पत्र लिहून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना मदत करण्याचे अवाहन केले. यात त्यांनी कट्टरपंथीयांनी केलेले युद्ध संपवण्यासाठी आणि त्यांची संसाधने, शस्त्रे, दारुगोळा तातडीने घेण्यास सांगण्यात आले. एका निवेदनात, सालेह मोठ्या मानवीय संकटाबद्दल देखील बोलताना म्हणाले, हजारो लोक तालिबानच्या हल्ल्यांमुळे विस्थापित झाले आहेत.

पंजशीरमध्ये (Panjshir) तालिबानला (Taliban) लढा देणाऱ्या संघटनांनी आता शांतता मार्गाने काढण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
पंजशीर! अफगाणचा एक असा प्रांत जो तालिबान्यांना 'कधीच काबीज करता आला नाही'

पाकिस्तान तालिबानला विरोध करणाऱ्या संघनांविरोधात तालिबानला पाठिंबा देत आहे. एवढेच नाही, तर पाकिस्तान तालिबानला हवाई सहाय्यताही देत ​​आहे. पाकिस्तानने तालिबानविरोधी सैन्याशी लढण्याऱ्यांच्या विरोधात एक विशेष फौज तयार केली आहे.

मसूद यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणले आहे की, आम्हाला ही लढाई संपवायची आहे. यावर चर्चेव्दारे तोडगा काढणाऱ्या प्रस्तावाचे आम्ही स्वागतच करु. NRF आमच्या समस्या सोडवण्यासाठी आणि लढाई संपवून चर्चेला तयार आहे. तालिबानने पंजशीर आणि अंदराब भागातील हल्ले त्वरीत थांबवून तेथील आपल्या हलचाली बंद केल्या तर NRF देखील ही लढाई थांबविण्यास तयार आहे. असेही यामध्ये नमूद करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com