काबूलबरोबरच तालिबानने (Taliban) अफगाणिस्तानातील (Afghanistan) अनेक प्रांत, शहरं आणि गावांवर सुद्धा कब्जा केला आहे. तालिबानने काबूलमध्ये (Kabul) प्रवेश करताच अफगाणिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष अशरफ घनीही (Ashraf Ghani) देश सोडून पळून गेले. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून बाहेर पडताच तालिबानने अतिशय वेगाने अफगाणिस्तानवर आपला अमल प्रस्थापित केला. राजधानीकडे कुच करत काही आठवड्यांत तालिबान्यांनी काबूल गाठले. तालिबान सध्या आपला विजय साजरा करत असेल, मात्र अफगाणिस्तानातील एक प्रांत अजुनही असा आहे, जिथे तालिबानी अजुन पाय ठेऊ शकले नाही.
अफगाणिस्तानवर कब्जा कब्जा केल्यानंतर सुद्धा तालिबान्यांच्या ताब्यात न आलेला हा प्रदेश म्हणजे उत्तर आघाडीचे माजी कमांडर अहमद शाह मसूद यांचा गड...अर्थात पंजशीर खोरे. हे जाणुन घेताना आश्चर्य वाटेल की, तालिबानने देशाच्या अनेक भागांवर कब्जा केला असेल मात्र आजही दहशतवादी असणारे तालिबानी काबूलजवळील पंजशीरवर हल्ला करणयापुर्वी हजार वेळा विचार करतात.
1990 च्या दशकात जेव्हा तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला होता, तेव्हाही तालिबान पंजशीरवर राज्य करु शकला नाही. ‘पंजशीर’ हे अफगाणिस्तानमधील एकमेव क्षेत्र आहे जिथे लोक तालिबानच्या दहशतीविरोधात बंडाचा झेंडा उभारता आहेत. अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्ला सालेह हे सुद्दा याच पंजशीर प्रांतातले आहेत, 1980 ते 2021 पर्यंत तालिबानी एकदाही पंजशीरवर ताबा मिळवु शकले नाहीत, यावरुन तालिबान्यांच्या मनात असलेला पंजशीरचा दरारा दिसुन येतो. हिंदुकुश पर्वताजवळ असलेल्या याठीकाणचे लोक हे गुरिल्ला वॉरफेअरच्या मदतीने युद्ध लढण्यासाठी पारंगत असल्याचे म्हटले जाते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.