'भिकेचा कटोरा', पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांचा 3.2 अब्ज डॉलर्सवर डोळा

पाकिस्तानात साडेतीन वर्षे सत्तेत राहीलेले माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची ओळख प्रत्येक परदेश दौऱ्यावर 'भिकेचा कटोरा' घेऊन जगातील देशांकडून पैसे उकळणारा नेता अशी होती.
Shehbaz Sharif
Shehbaz SharifDainik Gomantak

पाकिस्तानात साडेतीन वर्षे सत्तेत राहीलेले माजी पंतप्रधान इम्रान खान यांची ओळख प्रत्येक परदेश दौऱ्यावर 'भिकेचा कटोरा' घेऊन जगातील देशांकडून पैसे उकळणारा नेता अशी होती. त्याचवेळी आता काळ बदलला असून शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) देशाचे नवे पंतप्रधान बनले आहेत. मात्र अजूनही परिस्थिती 'जैसे थे' आहे. शाहबाज यांनाही 'इम्रान 2.0' बनण्याची घाई झाली आहे. वास्तविक, शाहबाज शरीफ गुरुवारी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान ते सौदी अरेबियाकडून $3.2 बिलियनच्या आर्थिक मदत पॅकेजची मागणी करणार आहेत.

Shehbaz Sharif
''पाकिस्तान कर्जात बुडाला'': पंतप्रधान शाहबाज शरीफ

जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, परकीय चलनाच्या साठ्यात आणखी घट होऊ नये म्हणून शाहबाज शरीफ सौदी अरेबियासमोर आर्थिक पॅकेजची मागणी करणार आहेत. आतापर्यंत सौदी अरेबियाने पाकिस्तानला 4.2 अब्ज डॉलर्स दिले आहेत. अशाप्रकारे 3.2 अब्ज डॉलर्सची रक्कम दिल्यानंतर सौदीने पाकिस्तानला कंगाल करण्यासाठी दिलेली रक्कम 7.4 अब्ज डॉलरवर पोहोचेल. गेल्या वर्षी ऑक्‍टोबरमध्‍ये, एका वर्षासाठी 3 अब्ज डॉलर रोख आणि 1.2 अब्ज डॉलर वार्षिक समतुल्य देय देण्‍याची घोषणा केली होती. सौदी अरेबियाशिवाय पाकिस्तानने चीनकडूनही मोठ्या प्रमाणात कर्ज घेतले आहे.

Shehbaz Sharif
पाकिस्तानी बोटीतून 280 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, दिल्ली-यूपी कनेक्शन असण्याची शक्यता

पाकिस्तानातील परकीय चलनाचा साठा कमी झाला आहे

वास्तविक, पाकिस्तानचा (Pakistan) परकीय चलनाचा साठा स्टेट बँक ऑफ पाकिस्तानकडे ठेवला जातो. स्टेट बँक ऑफ पाकिस्तान ही शेजारील देशाची मध्यवर्ती बँक आहे. गेल्या सहा आठवड्यांमध्ये पाकिस्तानच्या परकीय चलनाच्या साठ्यात मोठी घट झाली आहे. या दरम्यान 5.5 अब्ज डॉलरचा परकीय चलन साठा कमी झाला आहे. सध्या तो 10.8 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत परकीय चलनाच्या गंगाजळीत आणखी घसरण झाली तर त्यामुळे पाकिस्तानवर आर्थिक संकट येऊ शकते. यामुळेच हे संकट टाळण्यासाठी शाहबाज शरीफ आता सौदी अरेबियासमोर हात पसरण्याच्या तयारीत आहेत.

याशिवाय, पाकिस्तानच्या मागील इम्रान खान सरकारच्या काळात देशाला आर्थिक संकट आणि महागाईचा सामना करावा लागला होता. याशिवाय वाढत्या बेरोजगारीमुळेही अडचणी वाढल्या आहेत. त्याचवेळी सत्ता हाती घेतलेले नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांना आता या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. मात्र, सौदी अरेबिया (Saudi Arabia) आपल्याला कर्ज देईल, अशी आशा शाहबाज शरीफ यांना आहे. याद्वारे ते कमी होत असलेला परकीय चलनाचा साठा रोखू शकतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com