Pakistani Transgender: पाकिस्तानातील 'या' ट्रान्सजेंडर महिलांची जगभर होतेय चर्चा, फोटो पाहून तुम्हीही व्हाल घायाळ!

Pakistani Transgender: पाकिस्तानातील दोन ट्रान्सजेंडर महिलांची सध्या जगभर चर्चा होत आहे. आम्ही बोलत आहोत, शहजादी राय आणि चांदनी शाह यांच्याबद्दल.
Shehzadi Rai & Chandni Shah
Shehzadi Rai & Chandni ShahDainik Gomantak

Pakistani Transgender: पाकिस्तानातील दोन ट्रान्सजेंडर महिलांची सध्या जगभर चर्चा होत आहे. आम्ही बोलत आहोत, शहजादी राय आणि चांदनी शाह यांच्याबद्दल.

शहजादी राय आणि चांदनी शाह या दोघींनीही कराची महापालिका निवडणुकीत विजय मिळवला आहे. यामुळे त्यांची जगभरात चर्चेत होत आहे. लोक त्यांचे अभिनंदनही करत आहेत.

त्यांचे प्रकाशझोतात येण्याचे मुख्य कारण म्हणजे पाकिस्तानात पहिल्यांदाच ट्रान्सजेंडर या पदापर्यंत पोहोचले आहेत.

निवडणूक (Election) जिंकल्यानंतर दोघींनाही कॉन्सलर पदाची शपथ देण्यात आली. त्यांना त्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यावर जगभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ट्रान्सजेंडर कॉन्सलर

कॉन्सलर झाल्यानंतर, शहजादी म्हणाली की, मी एक ट्रान्सजेंडरच्या हक्कांसाठी लढणारी कार्यकर्ती आहे, मी जेंडर इंटरएक्टिव्ह अलायन्समध्ये वॉयलन्स केस मॅनेजर आहे. माझ्या समाजासाठी सेवा केल्याचा मला अभिमान आहे.

कॉन्सलर झाल्यानंतर शहजादीवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. लोक त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आणि त्यांच्यासोबत त्यांचे फोटो काढण्यासाठी पोहोचत आहेत.

शहजादी राय ही पाकिस्तानातील (Pakistan) तरुण ट्रान्सजेंडर असून तिचे वय 40 वर्षांपेक्षा कमी आहे. शहजादीला पाहून लोक क्लीन बोल्ड होत आहेत.

Shehzadi Rai & Chandni Shah
Pakistan Economic Crisis: गाढवांच्या भरोसे पाकिस्तानची अर्थव्यवस्था! वर्षभरात एवढ्या प्रमाणात वाढली संख्या; शाहबाज सरकार...

समाजात बदल घडवण्यासाठी...

जगभरात अनेक ट्रान्सजेंडर आहेत, ज्यांनी समाजात बदल घडवून आणण्याचे काम केले आहे. पाकिस्तानमध्येही असेच काही ट्रान्सजेंडर आता बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

ल्या महिन्यातच एका ट्रान्सजेंडर अलिना खानला मिस ट्रान्स पाकिस्तान 2023 चा ताज मिळाला होता. अलिना खान ही देखील सामान्य ट्रान्सजेंडर नाही. जेव्हा तिला मिस ट्रान्स पाकिस्तान 2023 चा किताब मिळाला, तेव्हा ती किती सुंदर असेल याची कल्पना करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com