Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानमध्ये जमावाकडून 4 पाकिस्तानी विद्यार्थ्यांची निर्घृण हत्या, दूतावासाकडे जीवाची भीक मागितली पण...

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी गेलेले विद्यार्थी एका नव्या समस्येत अडकले आहेत.
Kyrgyzstan Violence
Kyrgyzstan ViolenceDainik Gomantak

Kyrgyzstan Violence: किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी गेलेले विद्यार्थी एका नव्या समस्येत अडकले आहेत. येथील स्थानिक लोकांनी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर हल्ले सुरु केले आहेत. अशाच एका हिंसक जमावाने संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली. त्यांनी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना निशाणा बनवले. या हल्ल्यात पाकिस्तानी विद्यार्थी सर्वाधिक बळी ठरले. जमावाच्या हल्ल्यात सुमारे 4 पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. सध्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

दरम्यान, भारत, पाकिस्तान आणि इतर देशांतील हजारो विद्यार्थी किर्गिस्तानमध्ये मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी जातात. बहुतेक विद्यार्थी किर्गिस्तानची राजधानी बिश्केकमध्ये राहतात. मात्र अलीकडे बिघडलेल्या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे जगणे कठीण झाले आहे. पाकिस्तानी विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, काही इजिप्शियन विद्यार्थ्यांनी तिथे लुटमार करणाऱ्या स्थानिक चोरांशी झटापट केली तेव्हा हिंसाचार उसळला. त्यानंतर तेथील स्थानिक लोकांनी आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मारण्यास सुरुवात केली.

Kyrgyzstan Violence
Pakistan: बलुचिस्तानमध्ये पुन्हा 7 पंजाबींची हत्या; पाकिस्तानच्या तीन प्रांतात फुटीरतावादाची आग का धगधगतेय?

पाकिस्तानी दूतावासाकडून मदत मिळाली नाही

त्यांनी पाकिस्तान (Pakistan) दूतावासाकडे मदतीसाठी आवाहन केले पण तेथूनही मदत मिळू शकली नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. पाकिस्तान इतका असहाय्य झाला आहे की, तो पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या लोकांना दोन वेळचे अन्न पुरवू शकत नाही आणि पाकिस्तानबाहेर गेलेल्या लोकांचे संरक्षणही करु शकत नाही. 13 मे रोजी जेव्हा शेकडो लोकांचा जमाव वसतिगृहात घुसला आणि विद्यार्थ्यांना ओढत बाहेर काढले, तेव्हा अनेक पाकिस्तानी विद्यार्थ्यांनी दूतावासाला फोन केला पण दूतावासाने कोणतीही मदत केली नाही. नंतर एक अॅडवायजरी जारी करण्यात आली ज्यामध्ये पाकिस्तानी विद्यार्थ्यांना सतर्क राहण्यास सांगितले गेले. वसतिगृहातून बाहेर न जाण्यास सांगितले. पाकिस्तानचे 10 हजार विद्यार्थी किर्गिस्तानमध्ये शिकतात.

Kyrgyzstan Violence
Pakistan Road Accident: पाकिस्तानात भीषण अपघातात, 20 ठार 15 जखमी; बचावकार्य सुरु

पाकिस्तानी दूतावासाने प्रत्युत्तर दिले

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर पाक दूतावासाने खेद व्यक्त केला. बिश्केशमध्ये उपस्थित असलेले पाकिस्तानचे राजदूत मुश्ताक अहमद यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की, परिस्थिती अचानक बिघडली आहे, अचानक स्थानिक लोक मोठ्या संख्येने बाहेर आले आहेत, धैर्य ठेवा, आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहोत. अनेक पाकिस्तानी विद्यार्थ्यांचे (Students) म्हणणे आहे की, त्यांना आता बिश्केकमध्ये सुरक्षित वाटत नाही, दूतावासाने त्यांना लवकरात लवकर मायदेशात परत पाठवावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com