पाकिस्तानी पत्रकाराने हद्द केली ! पुराच्या पाण्यातून केले Live Reporting; Video

Pakistani Reporter: लाईव्ह रिपोर्टिंग करणे हे सोपे काम नाही.
Pakistani Anchor
Pakistani AnchorDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistani Reporter: लाईव्ह रिपोर्टिंग करणे हे सोपे काम नाही. रिपोर्टर कधीकधी परिस्थितीचे गांभीर्य अचूक दर्शवण्यासाठी कोणत्याही थराला जातात, अगदी स्वतःचा जीव देखील धोक्यात घालतात. यातच एका व्हिडीओमध्ये पाकिस्तानी अँकर देशातील पूरस्थितीबद्दल बोलत असताना गळ्या इतक्या खोल पाण्यात उभा असल्याचे दिसत आहे. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. तो संपूर्णपणे पाण्यात बुडाला आहे. व्हिडिओमध्ये केवळ त्याचे डोके आणि माईक दिसत आहे.

रिपोर्टर खोल पाण्यात अडकला

व्हिडीओ शेअर करताना अनुराग अमिताभ नावाच्या ट्विटर युजरने लिहिले की, 'डेंजरस, डेडली, किलर पाकिस्तानी रिपोर्टिंग.. पाकिस्तान जलमय झाला आहे. मात्र न्यूज चॅनल आर्मी आणि इम्रान खान (Imran Khan) यांच्यामुळे बेकाबू झाले आहेत. ते कोणत्याही थराला जात आहेत.'

Pakistani Anchor
Pakistan Flood: पाकिस्तानात महाप्रलय, 4 अब्ज डॉलरचं, लष्कराकडून बचावकार्य

दुसरीकडे, सोशल मीडियावर (Social Media) अनेकांनी त्याच्या कामाच्या नैतिकतेची प्रशंसा केली, तर काहींनी वृत्तवाहिनीच्या रिपोर्टरला धोक्यात आणल्याबद्दल टीका केली. एका यूजरने म्हटले की, 'सर रिपोर्टिंग केल्याबद्दल तुम्हाला सलाम.'

Pakistani Anchor
Pakistan Flood: पाकिस्तानात पुराचा कहर, शेकडो लोकांचा मृत्यू, 4.5 अब्ज डॉलर्सचे नुकसान

पूरस्थितीमुळे पाकिस्तानातील परिस्थिती अधिकच बिकट झाली

पाकिस्तान (Pakistan) एका दशकाहून अधिक काळातील सर्वात भीषण नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहे. जूनपासून पाकिस्तानातील पुरात मृतांचा आकडा 1,000 ओलांडला आहे. तर हजारो जण जखमी आणि विस्थापित झाले आहेत. जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, 14 जूनपासून पाऊस आणि पुरामुळे 1,033 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1,527 लोक जखमी झाले आहेत. पुरामुळे लाखो लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून त्यानंतर पाकिस्तान सरकारने राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com